ऊस पिकावर तुरा येण्याची कारणे व त्या वरील उपाय योजना
ऊस पिकावर तुरा
जर आपण ऊस पिकाचा विचार केला तर महाराष्ट्रमध्ये प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर ऊस लागवड होते. ऊस हे नगदी पीक असल्यामुळे बरेच शेतकरी बंधू उसाच्या लागवडीकडे वळले असून आता मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड होते. ऊस पिकाचा विचार केला तर हे बऱ्याच काळापर्यंत शेतात उभे राहणारे पीक असून त्यासाठी लागणारे पाणी आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन खूप महत्त्वाचे आहे. त्यासोबतच उसामध्ये अनेक प्रकारचे रोग आणि इतर काही समस्यांचा देखील प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो.
जर यावर वेळीच उपाययोजना केल्या नाही तर ऊस उत्पादनात घट येऊन शेतकरी बंधूंना आर्थिक फटका बसू शकतो. असेच एक उसामधील प्रमुख समस्या आहे ती म्हणजे उसाला तुरा येणे होय. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही बाब खूप नुकसानकारक ठरू शकते.
उसाच्या एकंदरीत गुणवत्तेवरच याच्यामुळे विपरीत परिणाम होतो. त्यामुळे या लेखात ऊसाला तूरा येण्याची कारणे कोणती आहेत याबद्दल या लेखात माहिती घेऊ.
उसाला तुरा येण्याची कारणे
1- ऊसाला तुरा येणे हे त्या उसाच्या जातीच्या अनुवंशिक गुणांवर देखील अवलंबून असते. उदाहरणच घ्यायचे झाले तर उसाचे को 7219, को 94012 त्याची जातींमध्ये ऊसाला तुरा लवकर येतो.
2- जर साडेबारा तासांचा दिवस आणि साडेअकरा तासांची रात्र अशा प्रकाश कालावधीमध्ये तुरा येतो.
3- जर ऑक्टोबर आणि सप्टेंबर महिन्यामध्ये पावसाचे प्रमाण जास्त असले तरी त्यावर्षी तुऱ्याचे प्रमाण जास्त असते.
4- दिवसाचे तापमान जर 26 ते 28 अंश डिग्री सेल्सिअस व रात्रीचे तापमान 22 ते 23° डिग्री सेल्सियस असले तरी तूरा येण्याचे प्रमाणात वाढ होते.
5- हवेतील आद्रतेचे प्रमाण 65 ते 90 टक्क्यांच्या आसपास व जमिनीतील पाण्याचे प्रमाण जास्त असल्यास देखील तुरा येतो.
पिकावर होणारा परिणाम ?
1- जर ऊसाला तूर आला तर पूर्णपणे वाढ थांबते व पक्वता वाढत जाते.
2- सुरू ऊसाला जर तुरा आला तर त्याची शाकीय वाढ होत नाही. परिणामी उत्पादन व साखर उताऱ्यामध्ये घट येते.
3- तुरा येण्यास सुरुवात झाल्यावर त्याची पाने अरुंद होतात व पिवळी पडायला लागतात.
4- पानाचे क्षेत्रफळ कमी होते व कर्बग्रहणाची क्रिया मंदावते. तसेच पोंग्यामधील कोंबाची वाढ थांबते.
5- जर तूर आलेला ऊस शेतामध्ये दीड ते दोन महिन्याच्या कालावधीपेक्षा जास्त उभा राहिला तर ऊस पोकळ पडतो व साखरेचा उतारा 18 ते 20 टक्क्यांपर्यंत घटतो.
उपायोजना :-
1- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे उसाची तोडणी लवकरात लवकर करणे महत्त्वाचे आहे.
2- उसाची लागवड शिफारस केलेल्या हंगामात व वेळेत करणे गरजेचे आहे. ऑगस्ट व सप्टेंबर मध्ये उगवण अथवा फुटवा अवस्था असेल तर त्यावर्षीच्या ऑक्टोबर डिसेंबर मध्ये तुरा येत नाही.
3- पावसाळ्याच्या कालावधीत उसाच्या शेतात पाणी साचणार नाही याची तंतोतंत काळजी घेणे गरजेचे आहे. तुरा येण्याच्या कालावधीत पाण्याचा ताण दिला तरी तुरा येणे टळते. ऊस पिकावर तुरा