कृषी महाराष्ट्र

पावसाच्या परतीच्या प्रवसात शेतकऱ्यांचा फायदा की तोटा ? हवामान खात्याचा अंदाज

पावसाच्या परतीच्या प्रवसात शेतकऱ्यांचा फायदा की तोटा ? हवामान खात्याचा अंदाज

 

माॅन्सूनच्या (Monsoon Update) परतीच्या प्रवासासाठी पोषक वातावरणाची निर्मिती झाली आहे. पुढील दोन दिवसांत माॅन्सून परतीच्या प्रवासावर निघण्याची शक्यता हवामान विभगानं विर्तविली. तर राज्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजही (Heavy Rainfall) हवामान विभागानं वर्तविला आहे.

पुढील दोन दिवसांत माॅन्सून परतीच्या प्रवासावर निघण्याची शक्यता हवामान विभगानं विर्तविली. तर राज्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजही हवामान विभागानं वर्तविला आहे.

केंद्रभागी जास्त भाग असणारी आणि वारे बाहेरच्या दिशेने फेकणारी प्रणाली (अॅन्टी सायक्लोन) तयार झाली आहे. त्यामुळं पश्चिम राजस्थान, पंजाब आणि हरियानामध्ये पुढील ५ कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे. ही पोषक स्थिती असल्यामुळं बुधवारपर्यंत माॅन्सून वायव्य भारतातील राजस्थान, पंजाब, हरियाना आणि गुजरातच्या काही भागातून माॅन्सून माघारी फिरण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तविली.

राज्यातही काही भागांत जोरदार पाऊस पडत आहे. कोकणातील रायगड, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये काही मंडळात जोरदार पाऊस झाला. तर बहुतांशी ठिकाणी हलक्या सरी पडल्या. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात मात्र पावसाचा जोर कमी होता. तसचं मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर, नाशिक, धुळे, नंदूरबार आणि जळगाव जिल्ह्यात सोमवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी लावली. धुळे आणि जळगाव जिल्ह्यात बहुतांशी भागांत पावसानं हजेरी लावली होती. तर नंदूरबार जिल्ह्यातही ठिकठिकाणी पाऊस झाला. पुणे आणि नाशिक जिल्ह्यातही बहुतांशी मंडळांमध्ये पावसानं हजेरी लावली.

मराठवाड्यातील काही मंडळात विजांसह तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, लातूर, बीड, हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यातही काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस झाला. तर अनेक ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. विदर्भातही अनेक मंडळांत विजांसह हलक्या पावसानं हजेरी लावली. शेतकऱ्यांचा फायदा

हवामान विभागानं उद्या सकाळपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही मंडळांमध्ये पावसाचा जोर अधिक राहील, असा अंदाजही हवामान विभागानं जारी केलाय.

आठवडाभरापासून राज्यात सुरू असलेल्या पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते, राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावासाचा अंदाज दिला आहे. आर विदर्भासह मराठवाड्याच पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांना देखील पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन देण्यात आले.

गणेशविसर्जनानंतर राज्यात मॉन्सून सक्रीय झाल्यामुळे पावसाचा जोर वाढला होता. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, घाटमाथा आणि विदर्भात अनेक ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावील होती. तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत होता. सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. काही ठिकाणीच हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला.

संदर्भ :- havamanandaj.in

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top