कृषी महाराष्ट्र

शेतकऱ्यांनी रब्बी पीक स्पर्धेत सहभाग घ्यावा, कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांचे आवाहन

शेतकऱ्यांनी रब्बी पीक स्पर्धेत सहभाग घ्यावा, कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांचे आवाहन

शेतकऱ्यांनी रब्बी पीक

रब्बी हंगामासाठी स्पर्धेत ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस अशी एकूण पाच पिके समाविष्ट आहेत. पीक स्पर्धेतील पिकाची निवड करताना त्या पिकाचे तालुक्यातील एकूण लागवड क्षेत्र किमान एक हजार हेक्टर असावे.

सोलापूर : राज्यामध्ये पिकाची उत्पादकता (Crop Productivity) वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात. उत्पादकतेत वाढ करणाऱ्या प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देण्यासाठी पीक स्पर्धेचे (Rabi Crop Competition) आयोजन करण्यात आले आहे. यंदाही रब्बी हंगामासाठी (Rabi Season) खास ही स्पर्धा आयोजिली आहे, त्यात सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केले आहे.

रब्बी हंगामासाठी स्पर्धेत ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस अशी एकूण पाच पिके समाविष्ट आहेत. पीक स्पर्धेतील पिकाची निवड करताना त्या पिकाचे तालुक्यातील एकूण लागवड क्षेत्र किमान एक हजार हेक्टर असावे. तथापि, संबंधित पिकाखालील क्षेत्र एक हजार हेक्टरपेक्षा कमी असल्यास व स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावयाचा असल्यास कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) यांची लेखी परवानगी घेणे बंधनकारक आहे.

तालुकास्तरावर स्पर्धेक संख्या सर्वसाधारण गटासाठी किमान दहा व आदिवासी गटासाठी किमान पाच असावी. पीक स्पर्धेमध्ये सहभागी शेतकऱ्यांच्या शेतावर त्या पिकाखाली (भात )किमान २० आर व इतर पिकांसाठी ४० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. प्रवेश शुल्क सर्व गटासाठी पीकनिहाय ३०० रुपये आहे. रब्बी हंगामामध्ये ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस या पिकांच्या स्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२२ आहे. शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

अशी असतील बक्षिसे

तालुकास्तर, जिल्हास्तर व राज्यस्तरावरील पीकस्पर्धा निकाल-प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पीकस्पर्धा विजेते निवडण्यात येतील. तालुका पातळीवरील सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी पहिले बक्षीस पाच हजार रुपये, दुसरे बक्षीस तीन हजार रुपये, तिसरे बक्षीस २००० रुपये, जिल्हा पातळीवर सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी पहिले बक्षीस रुपये दहा हजार, दुसरे बक्षीस सात हजार, तिसरे बक्षीस पाच हजार रुपये आहे. राज्य पातळीवर सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी पहिले बक्षीस ५० हजार रुपये, दुसरे बक्षीस ४० हजार रुपये आणि तिसरे बक्षीस ३० हजार रुपये आहे.

स्रोत : agrowon.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top