कृषी महाराष्ट्र

पीएम किसान शेतकरी सन्मान योजनेची ई-केवायसी पूर्ण करा

पीएम किसान शेतकरी सन्मान योजनेची ई-केवायसी पूर्ण करा असे आवाहन

 

सांगली : जिल्ह्यात पंतप्रधान शेतकरी सन्मान (पीएम किसान) योजनेचे ४ लाख ३६ हजार ६४५ लाभार्थी आहेत. त्यापैकी ३ लाख २० हजार ४३१ लाभार्थ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली असून १ लाख १६ हजार २१४ लाभार्थ्यांची प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे. प्रक्रिया प्रलंबित असलेल्यांनी ती तत्काळ पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले.

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत योजनेच्या (PM Kisan) लाभार्थ्यांची ई-केवायसी करण्यासाठी विशेष जनजागृती करण्याबाबत कार्यवाही सुरू आहे. योजनेचे वर्षासाठी २ हजार रुपयांचे तीन हप्ते असे एकूण वार्षिक ६ हजार रुपये शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून देण्यात येत आहेत.

हप्ते पुढे सुरू ठेवण्यासाठी पात्र लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण असणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने शेतकऱ्यांना स्वत: योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन वैयक्तिकरीत्या ई-केवायसी पूर्ण करावी. तसेच शेतकऱ्यांना महा-ई-सेवा केंद्र किंवा आपले सरकार केंद्रावर ई-केवायसी करता येईल. ई-केवायसी पूर्ण न केल्यास लाभार्थ्यांना पुढील हप्ता वितरित होणार नाही, असे केंद्र सरकारकडून कळविण्यात आले आहे.

तालुका एकूण लाभार्थी ई-केवायसी झालेले प्रक्रिया प्रलंबित

आटपाडी ३१८०१ २१८५० ९९५१

जत ७४३७३ ५७५२६ १६८४७

कडेगाव ३६८७१ २७५१६ ९३५५

कवठे महांकाळ ३०६४४ २३६९९ ६९४५

खानापूर २७३३१ १७७१६ ९६१५

मिरज ५८४१८ ३९४४७ १८९७१

पलूस २५४३२ १९३६२ ६०७०

शिराळा ३७६०६ २८५८३ ९०२३

तासगाव ४४२२८ ३२६८६ ११५४२

वाळवा ६९९४१ ५२०४६ १७८९५

एकूण ४३६६४५ ३२०४३१ ११६२१४

केवायसी म्हणजे काय? – 

KYC ही ग्राहकांची ओळख पडताळणी करण्याची एक प्रक्रिया आहे जी वित्तीय संस्थाने, जसे बँक, द्वारे वापरली जाते. KYC (Know Your Customer) म्हणजे आपला ग्राहक जाणून घेणे. भारत सरकार ने 2002 मध्ये ही प्रक्रिया सुरू केली होती आणि 2004 मध्ये सर्व बँक ने ही प्रक्रिया अवलंबावी अशी घोषणा केली होती. KYC सर्वात प्रथम Reserve Bank of India मध्ये 2005 रोजी ग्राहकांसाठी KYC ची सुरुवात केली.
बँकेत खाते सुरू करते वेळी बँक आपल्याला काही कागदपत्रे मागते, त्यात आपली ओळख, पत्ता असलेले Document असते, यालाच KYC प्रक्रिया असे म्हणतात. ग्राहकांची ओळख तपासणी करण्यासाठी बँक कागदपत्रे मागत असते. KYC चा उपयोग फक्त बँकेत नाही तर, ऑनलाईन शॉपिंग साईट्स, Mutual Funds Account, डिमॅट अकाउंट ओपन करतानाही केला जातो.
नवीन सिम कार्ड घेताना आपले आधार कार्ड तपासले जाते याला सुद्धा KYC प्रक्रिया म्हणतात. वाढत चाललेली धोकेबाजी रोखण्यासाठी सरकारने हा निर्माण घेतला होता, यामुळे कोणीही व्यक्ती दुसऱ्याच्या नावाचा दुरुपयोग नाही करू शकणार व Money Laundering सारख्या बेकायदेशीर गोष्टींना आळा बसेल.

केवायसी फुल फॉर्म – 

KYC चा फुल फॉर्म Know Your Customer असा होतो. मराठी मध्ये याचा अर्थ आपल्या ग्राहकास जाणून घ्या असा होतो. सर्व बँक, किंवा असे ठिकाणे जेथे Financial Transaction केले जातात त्यांना सर्वांना ग्राहकाबद्दल माहिती घेण्याचा अधिकार असतो. ग्राहकांची माहिती घेऊन त्यांची ओळख पडताळणी केली जाते.

केवायसी चे प्रकार – 

आपण वरती पाहिले की KYC प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मार्गाने करणे शक्य आहे, यावरूनच KYC चे दोन Types पडलेले आहेत.

१) EKYC

ई-केवायसी चे पूर्ण नाव Electronic Know your Customer असा होतो. EKYC प्रक्रिया कागद विरहित असते. ही प्रक्रिया डिजिटल पद्धतीने पूर्ण केली जाते व यात भौतिक स्वरूपात कागदपत्रांची आवश्यकता नसते.

२) CKYC

CKYC चे पूर्ण नाव Central Know your Customer असा होतो. ही प्रक्रिया भारतातील सर्व बँकेत वापरली जाते, त्यामुळे याला Central KYC म्हणतात. CKYC प्रक्रियेत बँकेत कागदपत्रे जमा करून फॉर्म भरून द्यावा लागतो.

केवायसी साठी आवश्यक कागदपत्रे – 

KYC प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मार्गाने करता येते. हे यावर ठरते की आपण सेवा कोठून मिळवतो. बँकेत जर KYC Verification करायचे असेल तर ती प्रक्रिया Offline आहे म्हणजे तुम्हाला बँकेत जाऊन कागदपत्रे जमा करावी लागतात व फॉर्म भरावा लागतो. डिमॅट खाते उगडणे किंवा Mutual Fund मध्ये Invest करणे यासाठी ऑनलाईन KYC असते, यात कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावे लागतात.

KYC साठी लागणारे Documents खाली दिले आहेत –

  • आधार कार्ड
  • मतदान कार्ड/ओळखपत्र
  • पॅन कार्ड
  • पासपोर्ट
  • वाहक परवानाही कागदपत्रे

KYC Verification साठी आवश्यक असतात. यातील जर कोणत्याही कागदपत्रावर आपला पत्ता नसेल तर आपल्याला दुसरा Document जोडावा लागेल ज्यात आपला पत्ता असेल.

केवायसी (KYC) करणे का गरजेचे आहे? – 

आपल्या मनात प्रश्न नक्कीच आला असेल तर बँकांना आपल्या ग्राहकांकडून KYC करून घेण्याची गरज का पडली? जेंव्हा ग्राहक बँकेत खाते खोलतो त्यावेळेस तो वयक्तिक माहिती जसे नाव, पत्ता, ई बँकेला सांगतो. पण दिलेली माहिती खरी आहे का खोटी हे बँकेला माहिती होण्यासाठी ठोस पुरावा द्यावा लागतो. याने बँकेला कळते की ग्राहकाने दिलेली माहिती खरी आहे. यासाठीच सर्व वित्तीय संस्थानात KYC अनिवार्य केलेली आहे.

पैशांची धोकेबाजी, Money Laundering अश्या गोष्टींना रोखण्यासाठी KYC महत्वाची असते. KYC प्रक्रिया ने व्यक्तीची Financial History बद्दल कळते. KYC केल्याशिवाय बँकेत खाते खोलता येत नाही, Mutual Funds मध्ये इन्व्हेस्टमेंट करता येत नाही. केवायसी (KYC) Verification करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.
कशी करायची एम किसान सन्मान निधी साठी ई-केवायसी

पुढील लिंकवर जाऊन तुम्ही तुमची ई-केवायसी करू शकता :

https://exlink.pmkisan.gov.in/aadharekyc.aspx

स्रोत : agrowon.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top