कृषी महाराष्ट्र

आता नैसर्गिक शेती करणाऱ्यांना मिळणार अनुदान ? वाचा संपूर्ण माहिती

आता नैसर्गिक शेती करणाऱ्यांना मिळणार अनुदान ? वाचा संपूर्ण माहिती

आता नैसर्गिक शेती

Natural Farming : नैसर्गिक शेती पद्धत आता देशात अनेक शेतकरी वापरू लागले आहेत. देशी गायीचं शेण, गोमूत्र, गूळ, चणा डाळीचं पीठ, पाणी तसंच कडुनिंब, मिरची आणि इतर नैसर्गिक गोष्टीनी सहजरीत्या तयार होणाऱ्या जीवामृत, घनजीवामृत, बीजामृत आणि इतर विविध प्रकारांनी मातीची गुणवत्ता सुधारत आहे, त्याचबरोबर शेती उत्पादनातही वाढ होत आहे

सध्या हवामानात सातत्यानं बदल होत आहेत. या बदलाचा शेती क्षेत्रावर मोठा परिणाम होताना दिसत आहे. तसेच शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील वाढला आहे. सातत्यानं खतांच्या बियाणांच्या किंमती वाढत आहेत. उत्पादन खर्चाच्या मानाने शेतीतून नफा मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती करण्याचं आवाहन हरियाणा सरकारनं केलं आहे.

नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हरियाणा सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना देशी गायींच्या खरेदीवर 25 हजार रुपयांचं अनुदान दिलं जाणार असल्याची माहिती कृषीमंत्री जे पी दलाल (Jai Parkash Dalal) यांनी दिली.

काल (23 डिसेंबर) राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा करण्यात आला. या कृषी दिनाच्या पार्श्वभूमीवर हरियाणाचे कृषीमंत्री जे पी दलाल यांनी शेतकऱ्यांना गायीच्या खरेदीसाठी 25 हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. किमान आपल्या उपजीविकेसाठी तरी शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेतीचा अवलंब करावा असं आवाहन मंत्री दलाल यांनी केलं आहे.

शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीबाबत जागरूक करण्यासाठी कृषी विद्यापीठ आणि कृषी विभाग तांत्रिक ज्ञान आणि प्रशिक्षण यांच्याकडून विविध सत्रांचेही आयोजन करण्यात येत आहे. मार्गदर्शनाबरोबरच आर्थिक मदतही केली जाणार असल्याचे दलाल म्हणाले.

चौधरी चरणसिंग हरियाणा कृषी विद्यापीठ, हिस्सार इथे शेतकरी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना हरियाणाचे कृषी मंत्री जेपी दलाल म्हणाले की, मत्स्यपालन व्यवसायातून 10 हजार शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.

काही काळापासून हिरव्या चाऱ्याचा देखील तुटवडा आहे. त्यासाठी सायलेजचा व्यवसाय करण्यासाठी 50 लाखांपर्यंतच्या आर्थिक मदतीचीही तरतूद करण्यात आल्याची माहिती जे पी दलाल यांनी दिली आहे.

नैसर्गिक शेतीचे फायदे

रासायनिक खतांचा वापर करून उत्पादन म्हणजे विषयुक्त अन्नाचा आपण पुरवठा करीत आहोत. हे बंद करायचे असेल तर नैसर्गिक शेती शिवाय पर्यायच नाही. नैसर्गिक शेतीमुळे कोणतेही आजार उद्भवत नाहीत. एकदा जर का सेंद्रिय शेतीतील अन्नाची सवय झाली तर पुन्हा कोणी रासायनिक खताचा वापर करणार नाही असा विश्वास सुभाष पालेकर यांना आहे. नैसर्गिक शेती करिता केवळ एका गाईची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 3 एकरातील जमिनीची जोपासना करण्यासाठी केवळ एका देशी गाईचे गोमूत्र आणि शेण आवश्यक असल्याचेही पालेकर म्हणाले आहेत. ‘झिरो बजेट शेती’ शिवाय शेतकऱ्यांच्या आत्महत्याही रोखता येणार नाहीत. कारण रासायनिक खतावर होत असलेला खर्च आणि प्रत्यक्षात उत्पादन याचा ताळमेळ लागत नसल्याने शेतकरी आत्महत्या वाढत आहेत.

स्रोत : krishijagran.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top