कृषी महाराष्ट्र

मिनी ट्रॅक्टर खरेदीवर शेतकऱ्यांना मिळणार 90% अनुदान, शेवटची तारीख कोणती वाचा संपूर्ण

मिनी ट्रॅक्टर खरेदीवर शेतकऱ्यांना मिळणार 90% अनुदान, शेवटची तारीख कोणती वाचा संपूर्ण

 

यांत्रिकीकरण हा एक कृषी क्षेत्राचा अविभाज्य भाग झाला असून यांत्रिकीकरणाचे महत्त्व हे शेती क्षेत्रासाठी खूप महत्त्वाचे आहे. यंत्राचा शिरकाव शेती क्षेत्रात झाल्याने फार मोठा अमुलाग्र बदल झालेला आहे. शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा यामध्ये प्रामुख्याने बचत होऊन शेतीची कामे अगदी वेळेत पूर्ण होण्यास मदत झालेली आहे. जर आपण कृषी क्षेत्राबद्दल यंत्रांचा वापराचा विचार केला तर प्रामुख्याने ट्रॅक्टर हे यंत्र खूप महत्त्वपूर्ण असून सर्वात जास्त वापर हा ट्रॅक्टरचा केला जातो. त्यातल्या त्यात बहुसंख्य फळ बागायतदार शेतकरी मिनी ट्रॅक्टरचा वापर मोठ्या संख्येने करतात.

कारण मिनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने फळबागांमधील अंतर मशागत करणे सोपे जाते व शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा वाचतो. याच शेतकरी बंधूंसाठी फायद्याच्या मिनी ट्रॅक्टर विषयक महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे.

मिनी ट्रॅक्टरवर मिळणार 90% अनुदान

शेतकऱ्यांना फायदा होईल अशी एक योजना सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून राबवली जात असून योजनेच्या अंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकाच्या स्वसहायता बचत गटांना 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर उपलब्ध करून दिले जाणार असून या ट्रॅक्टर साठी लागणाऱ्या इतर उपकरणांवरदेखील अनुदान देय आहे.

तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तरी यासाठी 23 डिसेंबर ही शेवटची तारीख असून या तारखेपर्यंत अर्ज करण्याचे आव्हान सोलापूर जिल्ह्याचे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त कैलास आढे यांनी केले असून या योजनेच्या बचत गटांचे उत्पन्न वाढवता यावे यासाठी प्रयत्न केले जात आहे.

अनुसूचित जाती व नव बौद्ध घटकांना या योजनेच्या माध्यमातून मिनी ट्रॅक्टर वर 90% अनुदान म्हणजेच यासाठीची जास्तीची मर्यादा सव्वा तीन लाख रुपये आहे. या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी स्वयंसहायता बचत गटांना त्यांच्या हिश्याची दहा टक्के रक्कम भरल्यानंतरच या 90 टक्के अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे. यासाठी लवकरात लवकर अर्ज करण्याच्या आव्हान देखील करण्यात आले आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता

  1. सदर बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असणे गरजेचे आहे.
  2. तसेच बचत गटातील 80% सदस्य हे अनुसूचित जाती आणि नव बौद्ध घटकातीलच राहणे आवश्यक आणि बंधनकारक आहे.
  3. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जातीचे दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
  4. ज्या कोणी या योजनेचा अगोदर लाभ घेतला असेल अशा व्यक्ती या योजनेसाठी पात्र राहणार नाहीत.

सोलापूर जिल्ह्यातील इच्छुकांनी या ठिकाणी साधावा संपर्क

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील स्वयंसहायता बचत गटाच्या विहित नमुन्यातील अर्जासाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन तिसरा मजला, सात रस्ता, सोलापूर या कार्यालयात कार्यालयिन वेळेत संपर्क साधावा असे देखील आवाहन करण्यात आले.

source : krishijagran

krushi maharashtra,krishi maharashtra,कृषी महाराष्ट्र ,agriculture in marathi,मिनी ट्रॅक्टर,महाराष्ट्र ,शेतकऱ्यांना मिळणार 90% अनुदान,grant,Farmers will get 90% subsidy on purchase of mini tractors,मिनी ट्रॅक्टर खरेदीवर शेतकऱ्यांना मिळणार 90% अनुदान, शेवटची तारीख कोणती वाचा संपूर्ण

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top