कृषी महाराष्ट्र

Floriculture : फुलशेती शेतकऱ्यांसाठी वरदान

Floriculture : फुलशेती शेतकऱ्यांसाठी वरदान

 

Raigad News : जिल्ह्यात फुलशेतीला मिळणारा वाव, सरकारकडून मिळणारे अनुदान व जवळच असणारी मुंबईची मोठी बाजारपेठ याचा विचार करता जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी फुलपीक योजना वरदान ठरणार असून शेतकऱ्यांनी याचा फायदा घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

आंबा, काजूसारख्या फळपिकांबरोबरच शेतकऱ्यांना फूल शेतीमध्येही चांगले उत्पन्न मिळू लागले आहे. शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेऊन फुलशेतीमध्ये प्रगती करावी यासाठी शेती विभाग सरसावला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग वन पिके, मसाला पिके व फूल शेती आदींसाठी एक ते तीन वर्षे अनुदान तत्त्वावर शासकीय योजना कार्यान्वित आहे. Floriculture

वैयक्तिक लाभार्थ्यांच्या सलग शेतजमिनीवर, शेताच्या बांधावर व पडीक जमिनीवर फुलशेती लागवड कार्यक्रम राबविण्यास सरकारची तांत्रिक व प्रशासकीय मान्यता आहे.

शासन निर्णयानुसार, द्राक्ष, केळी, ड्रॅगनफ्रूट आणि मसाला पिके तसेच गुलाब, मोगरा, निशिगंध, व सोनचाफा या चार फुलपिकांचा समावेश करून आणि या पिकांचे आर्थिक मापदंडास मान्यता दिली आहे.

त्यामुळे शेतकरी मोगरा, निशिगंध, गुलाब व सोनचाफा यांची लागवड फायदेशीर आहे. मुंबई बाजारपेठ जवळ असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होऊ शकतो.

फुलशेतीतून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून निर्यातीस चालना मिळेल, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. मोगरा, निशिगंध, गुलाब व सोनचाफा या लागवडीसाठी सरकारकडून हेक्टरी दोन लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकते. Floriculture

लागवडीसाठी कमीतकमी ०.०५ हेक्‍टर व जास्तीत जास्त २ हेक्‍टर प्रती लाभार्थी क्षेत्र मर्यादा आहे. यासाठी रोहयोतून जॉब कार्ड, ७/१२ उतारा, ८-अ, योजनेसाठी अर्ज व संयुक्त खातेदार असल्यास संमती पत्र, बँक पासबुकची छायांकित प्रत ही कागदपत्रे आवश्यक आहेत.

कोकणात विशेषतः ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मोगरा, निशिगंध, गुलाब व सोनचाफा या फुलांची शेती केली जाते. फुलशेतीसाठी राज्य सरकारने हातभार लावला असून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेंतर्गत फूलपीक लागवडीसाठी अनुदान देण्यात येणार आहे. फूलशेतीचे उत्पादन बारमाही असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होऊ शकतो. रायगड जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.

– उज्ज्वला बाणखेले, जिल्हा कृषी अधीक्षक

source:agrowon

Floriculture

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top