कृषी महाराष्ट्र

पूर्वहंगामासाठी उसाचे ठिबकद्वारे अन्नद्रव्य व्यवस्थापन कसे करावे ? वाचा संपूर्ण माहिती

पूर्वहंगामासाठी उसाचे ठिबकद्वारे अन्नद्रव्य व्यवस्थापन कसे करावे ? वाचा संपूर्ण माहिती

पूर्वहंगामासाठी उसाचे

ऊस पिकासाठी (Sugarcane Crop) अन्नद्रव्यांचा कार्यक्षम वापर होऊन दर एकरी ऊस उत्पादन वाढ होण्यासाठी ठिबक सिंचनाद्वारे शिफारशीत खत मात्रा द्यावी.

ठिबक सिंचनाद्वारे अन्नद्रव्यांचे योग्य व आवश्यक प्रमाण असणारी पाण्यात विरघळणारी खते पिकांच्या मुळांशी योग्य त्या प्रमाणात परिणामकारकरीत्या देता येतात.

ठिबक सिंचनातून द्यावयाची खते निवडण्यासाठी व त्यांचा कार्यक्षम वापर होण्यासाठी योग्य प्रमाण आवश्यक असते. खतांच्या द्रावणामध्ये आवश्यक अन्नद्रव्याचे प्रमाण जास्तीत जास्त असावे.

शेतीतील तापमानास खते पाण्यात लवकरात लवकर व पूर्णपणे विरघळणारी असावीत. खते पाण्यात विरघळताना किंवा विरघळल्यानंतर त्यातील क्षारांचे अविद्राव्य स्वरूपात एकत्रीकरण होऊ नये.

खतातील क्षारांमुळे गाळण यंत्रणा व ठिबक सिंचनाच्या तोट्या बंद पडू नये तसेच संचातील कोणत्याही घटकावर गंज चढू नये अथवा अनिष्ट परिणाम होऊ नये. खते शेतातील वापरासाठी सुलभ व सुरक्षित असावीत.

खतांची पाण्यामध्ये असणाऱ्या मीठ व इतर क्षारांबरोबर रासायनिक अभिक्रिया होऊ नये. एका वेळी एकापेक्षा जास्त खते एकत्रित देताना त्यांची आपआपसात कोणतीही अभिक्रिया होणार नाही अशीच खते एकत्रित द्यावीत.

ठिबक सिंचनाद्वारे खते देण्याच्या पद्धती

ठिबक सिंचनाद्वारे खते देताना प्रमाणबद्ध आणि मात्राबद्ध पद्धतीने खते देता येतात. प्रमाणबद्ध पद्धतीमध्ये खतांची तीव्रता खत देण्याच्या संपूर्ण कालावधीमध्ये सारखी राहते. खत मात्रा व पाण्याचा प्रवाह सतत सारखा राहतो.

उदा. १ लिटर खत द्रावण आणि १०० लिटर पाणी या पद्धतीमध्ये खतमात्रा तीव्रतेच्या स्वरूपात म्हणजेच पीपीएम मध्ये मोजली जाते.

मात्राबद्ध पद्धतीमध्ये खताची तीव्रता बदलत राहते. ठिबक सिंचनाद्वारे खत मिश्रित व खत विरहित पाणी पिकाच्या मुळांशी सतत दिले जाते. या पद्धतीमध्ये खत मात्रा किलोग्रॅम / हेक्टर या स्वरूपात मोजली जाते. ठिबक सिंचनातून खते देण्यासाठी फर्टीलायझर टाकी अथवा व्हेंचुरी अथवा फर्टिलायझर इंजेक्शन पंप या उपकरणांचा वापर केला जातो.

ऊस हे पीक जास्त कालावधीचे असून त्याची उत्पादन देण्याची क्षमता प्रचंड असल्याकारणाने त्याची अन्नद्रव्यांची गरज ही जास्त असते. १२ महिन्यांचे ऊस पीक साधारणपणे एक टन ऊस उत्पादनासाठी जमिनीतून १.१ किलो नत्र, ०.६ किलो स्फुरद आणि २.२५ किलो पालाश शोषून घेते.

म्हणजेच हेक्टरी १५० टन ऊस उत्पादनासाठी जमिनीतून १५० किलो नत्र, ९० किलो स्फुरद आणि ३३७.५ किलो पालाश शोषून घेतले जाते. त्याप्रमाणात अन्नद्रव्य पुरवठा करणे जरुरीचे आहे.

फर्टिगेशन उपकरणांचा तुलनात्मक अभ्यास
विवरण फर्टिलायझर टाकी व्हेंचुरी फर्टिलायझर

अन्नद्रव्यांचे कार्य

नत्राचे कार्य

नत्र हा ऊस उत्पादनातील महत्त्वाचा अन्नघटक असून त्याची कमतरता भासल्यास उसातील हरितद्रव्यांचे प्रमाण कमी होऊन ऊस पिवळा पडतो, पाने आकाराने कमी राहतात, कांड्या आखूड व कमी जाडीच्या होतात आणि मुळे लांब परंतु बारीक राहतात आणि पर्यायाने ऊस उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो.

नत्राचा पुरवठा जास्त प्रमाणात व जास्त कालावधीसाठी झाल्यास उसाची शाकीय वाढ होत राहते, पक्वता लांबणीवर जाते आणि रसाची शुद्धता कमी होते.

नत्राच्या जास्त वापरामुळे उसाचा रसरशीतपणा वाढतो. त्यामुळे रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढतो. उसाची शाकीय वाढ मोठ्या प्रमाणावर झाल्याने ऊस लोळण्याची शक्यताही वाढते.पूर्वहंगामासाठी उसाचे
नत्र हा सर्व प्रकारच्या प्रथिनांचा तसेच हरीतद्रव्यांचा अविभाज्य घटक आहे.

नत्र पाने, खोड व फांद्यांची वाढ जोमाने करतो, परंतु मुळांची वाढ खुंटवितो.
वनस्पतीच्या शरीरात प्रथिनांचे प्रमाण वाढवितो. उसाच्या वाड्याची नाजूकता व रसरशीतपणा वाढवून त्याचा दर्जा उंचावतो.

पालाश, स्फुरद आणि इतर अन्नद्रव्यांचे जास्तीत जास्त प्रमाणात शोषण घडवून आणतो.

स्फुरदाचे कार्य

नत्र आणि पालाशच्या तुलनेने पिकांना स्फुरदाची आवश्यकता कमी प्रमाणात लागते.
स्फुरद हा न्यूक्लिक आम्ल फायटीन व फोस्फोलिपिडस यांचा घटक आहे.

सुरवातीच्या अवस्थेत स्फुरदाचा भरपूर पुरवठा झाल्यास फुटवे लवकर व भरपूर फुटतात.
मुळांची लवकर व भरपूर वाढ घडवून आणतो, पीक जोमाने वाढण्यास मदत होते.
स्फुरदामुळे जलद व जोमदार वाढ होऊन उसास टणकपणा येतो.

जास्त नत्रामुळे होणाऱ्या अनिष्ट परिणामास प्रतिबंध होतो.
पीक लवकर पक्व होते, बीज धारणा व पिकाची वाढ जलद गतीने होण्यास मदत होते. दर्जा सुधारतो.

वातावरणातील नत्र जास्त प्रमाणात शोषून घेण्यास मदत होते.

अरुण देशमुख, ९५४५४५६९०२, (उपसरव्यवस्थापक व प्रमुख, कृषी विद्या विभाग,नेटाफिम इरिगेशन इंडिया प्रा.लि.पुणे.)

स्रोत : agrowon.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top