गाई पाळणाऱ्यांना दरमहा मिळणार पैसे ! संस्कृती नष्ट होत असल्याने सरकारचा निर्णय
गाई पाळणाऱ्यांना
भारतात गायीला मातेचा दर्जा देण्यात आला आहे. हिंदू धर्माला मानणारे लोक प्रत्येक जीवावर प्रेम करतात, पण त्यांना गायीबद्दल विशेष आसक्ती असते. हिंदू धर्मात गाईला अत्यंत पवित्र प्राणी मानून तिला मातेचा दर्जा देण्यात आला आहे. यामुळेच सनातन धर्माच्या धार्मिक कार्यात गाईच्या दुधाबरोबरच गाईचे शेण आणि मूत्रही वापरले जाते.
आता मात्र हळूहळू गायीचे संगोपन करणारी संस्कृती नष्ट होत असून, ही संस्कृती वाचवण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जे लोक गायी पाळतील आणि सेंद्रिय शेती करतील त्यांना दर महिन्याला 900 रुपये देण्याचा निर्णय मध्य प्रदेश सरकारने घेतला आहे. या योजनेंतर्गत मध्य प्रदेश सरकारने 22000 शेतकऱ्यांना पहिला हप्ताही जारी केला आहे.
यासोबतच शासनाने राज्यात पशुवैद्यकीय रुग्णवाहिका सेवाही सुरू केली आहे. यासोबतच शेणखतही खरेदी करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. शिवराज सिंह चौहान म्हणतात की, राज्यभरात अनेक गोवर्धन प्लांट उभारून ते शेणापासून सीएनजी बनवणार आहेत.
जे लोक गायी पाळतील आणि सेंद्रिय शेती करतील त्यांना दर महिन्याला 900 रुपये देण्याचा निर्णय मध्य प्रदेश सरकारने घेतला आहे. या योजनेंतर्गत मध्य प्रदेश सरकारने 22000 शेतकऱ्यांना पहिला हप्ताही जारी केला आहे. यामुळे याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे.
source : krishijagran