कृषी महाराष्ट्र

गायपालन व्यवस्थापन – दिवसाला ५० ते ५५ लिटर दूध देणारी हरधेनू गाय

गायपालन व्यवस्थापन – दिवसाला ५० ते ५५ लिटर दूध देणारी हरधेनू गाय

 

सध्या पशुपालन व्यवसाय हा हायटेक होऊ लागला आहे. आताची तरुण पिढी जी शेतीमध्ये पाऊल ठेवत आहे असे तरुण आता शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसायाकडे मोठ्या प्रमाणावर वळत आहेत. जास्त करून पशुपालन व्यवसायामध्ये म्हैसपालन आणि गाईंचे पालन केले जाते.या माध्यमातून दूध उत्पादन हा प्रमुख आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत असल्यामुळे बरेच शेतकरी बंधूंची जातिवंत गाई व म्हशी घेण्याकडे कल असतो.

जर आपण यामध्ये प्रामुख्याने गाईंच्या जातींचा विचार केला तर यामध्ये देशी आणि संकरित या दोन प्रकारच्या गाई असतात.बहुतेक शेतकरी जर्सी,एचएफ अर्थात होल्स्टिन फ्रिजियन या प्रकारच्या जातींचे पालन करतात. त्यासोबतच देशी गाई मध्ये देखील गिर, लाल कंधारी यासारख्या जाती खूप महत्त्वपूर्ण आहेत.

पण वाढीव उत्पादनासाठी अशीच एक गाईची जात आहे जी खूप महत्त्वपूर्ण असून या गाईपासून मिळणारे दुधाचे उत्पादन देखील जास्त असते व या गाईचे नाव आहे हरधेनू गाय हे होय. गाईच्या जाती बद्दल आपण या लेखात माहिती घेऊ.

हरधेनू गाय शेतकऱ्यांसाठी किफायतशीर

जर आपण या गाईचा विचार केला तर हरियाणाच्या लाला लजपतराय युनिव्हर्सिटी ऑफ व्हेटर्नरी अँड अनिमल सायन्सेस येथील शास्त्रज्ञांनी तीन गाईंच्या जातींचे एकत्रित संकर करून ही गाय तयार केली आहे.

तज्ञांच्या मते ही जात होल्स्टिन फ्रिजीयन, स्थानिक हरियाणवी आणि साईवाल जातीच्या संकरित जाती पासून तयार करण्यात आली आहे.

दररोज 55 ते 60 लिटर दूध देण्याची क्षमता

जर आपण या गाईचा विचार केला तर या गाईची दूध देण्याची क्षमता इतर जातींच्या तुलनेमध्ये खूप जास्त आहे.

या गाईपासून मिळणारे दुधाचा रंग हा इतर गाईच्या दुधापेक्षा जास्त पांढरा असतो तसेच जर आपण इतर गाईंच्या दूध देण्याची क्षमता याचा विचार केला तर दिवसाला सरासरी पाच ते सहा लिटर दूध देतात परंतु हरधेनू गाय दिवसाला पंधरा ते सोळा लिटरपर्यंत दूध देते. या गाईचे आहार व्यवस्थापन वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित राहिल्या तर एका दिवसात 55 ते 60 लिटर दूध ही गाय देऊ शकते.

अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला गायीच्या अशाच एका प्रगत जातीबद्दल सांगणार आहोत, ज्याचे संगोपन करून तुम्ही मोठ्या प्रमाणावर दुधाचा व्यवसाय करू शकता. मित्रांनो आज आपण भारतीय वैज्ञानिकांनी विकसित केलेल्या आणि तब्बल 55 लिटर दूध उत्पादन क्षमता असलेल्या हरधेनु गाई (Hardhenu Cow) विषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो हरधेनू गाय भारतीय वैज्ञानीकांनी विकसित केलेली गाईची एक संकरित आणि सुधारित जात आहे. या जातीला तिच्या चांगल्या दूध उत्पादनामुळे कामधेनू असं देखील म्हणतात. या गाईला हरियाणाच्या लाला लजपत राय पशुवैद्यकीय आणि प्राणी विज्ञान विद्यापीठाच्या (लुवास) येथील शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे.

ही गाय 3 जातींमधून संकर करून विकसित करण्यात आली असल्याने या जातीची गाय अधिक दूध उत्पादन देण्यास तसेच या जातीची रोगप्रतिकारक क्षमता देखील चांगली आहे. मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की हरधेनू गाय उत्तर-अमेरिकन (होलस्टीन फ्रिजन), देसी हरियाणा आणि साहिवाल जातीपासून क्रॉस ब्रीड करण्यात आली आहे. गायपालन व्यवस्थापन

दुग्ध व्यवसायातील जाणकार लोक या जातीची माहिती देताना सांगतात की, हरधेनू जातीच्या गायी 50 ते 55 लिटरपर्यंत दूध देऊ शकतात. तीन जातींचा संकर करून तयार करण्यात आलेली हरधेनू जातीची गायमध्ये होलस्टीन फ्रिजन गायीचे 62.5 टक्के रक्त आढळते तसेच हरियाणा आणि साहिवाल जातींचे 37.5% रक्त असते. गायपालन व्यवस्थापन

या संकरित जातीची इतर गायींशी तुलना केल्यास अस आढळून आल आहे की, स्थानिक जाती दररोज सरासरी 5 ते 6 लिटर दूध देतात तर ही हरधेनु संकरीत गाय दररोज सरासरी 15 ते 16 लिटर दूध देऊ शकते. जाणकार लोकांच्या मते, ही गाय एका दिवसात 40 ते 50 किलो हिरवा चारा तसेच 4 ते 5 किलो सुका चारा खाते. निश्चितच या जातीचा खुराक देखील इतर जातींच्या तुलनेत चांगला आहे. अशा परिस्थितीत ही जात दुग्ध उत्पादक शेतकरी बांधवांसाठी निश्‍चितच फायद्याची ठरणार आहे.

हरधेनु गाईचे वैशिष्ट्य तर जाणून घ्या

  1. हरधेनू जातीची गाय सुमारे 20 महिन्यांत प्रजननासाठी तयार होते, तर स्थानिक जातीला यासाठी 36 महिने लागतात.
  2. ही गाय 30 महिन्यांपासून वासरे देण्यास सुरुवात करते, तर इतर जाती 45 महिन्यांपासून जन्म देतात.
  3. संकरित गाय हरधेनू दूध उत्पादनासाठी विशेष ओळखली जाते.
  4. या जातीची अजून एक विशेषता म्हणजे या जातीच्या गाईच्या दुधात फॅटचे प्रमाण देखील इतर जातींच्या गाईंपेक्षा अधिक आढळते.
  5. भारतीय हवामानात ही गाय चांगले दूध उत्पादन देत असते. खरे पाहता, या गायी कोणत्याही तापमानात राहू शकतात.
  6. या जातीच्या गाईपासून 50 ते 55 लिटर दूध मिळू शकते.

birdocean.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top