कृषी महाराष्ट्र

Tur Market : तूर दरातील तेजी आणखी किती दिवस टिकेल ? शेतीमाल बाजारातील महत्वाच्या 5 बातम्या

Tur Market : तूर दरातील तेजी आणखी किती दिवस टिकेल ? शेतीमाल बाजारातील महत्वाच्या 5 बातम्या

 

1.कापूस बाजार दबावातच (Cotton Rate)

देशातील बाजारात कापूस आवकेचाी गती सरासरीपेक्षा जास्तच आहे. भारतीय कापूस महामंडळाच्या मते देशातील बाजारात १० जुलैपर्यंत ३०८ लाख गाठी कापूस आला. म्हणजेच देशातील कापूस उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा जास्त असल्याचे संकेत दिले. तर दुसरीकडे बाजारातील दर ६ हजार ५०० ते ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान भाव आहेत. खरिपातील कापूस लागवड अद्यापही पिछाडीवर आहे. तरीही कापसाचे भाव आणखी काही दिवस दबावात दिसू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

2.सोयाबीन लागवड पिछाडीवर (Soyabin Sowing)

देशातील सोयाबीन लागवड अद्यापही पिछाडीवर आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील लागवड यंदा कमी दिसते. त्यामुळे उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण सध्या आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव, देशातील खाद्यतेलावरी दबाव यामुळे सोयाबीन बाजार दबावात आहे. सोयाबीनला सध्या सरासरी ४ हजार ५०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. लागवड पिछाडीवर राहिल्यास दराला आधार मिळू शकतो. पण काही दिवस त्यासाठी वाट पाहावी लागू शकते, असे जाणकारांनी सांगितले.

3. हरभरा दरात काही वाढ

हरभऱ्याला आता हळूहळू मागणी वाढत आहे. पाऊस सुरु झाल्याने बाजारातील आवकही खूपच कमी झाली. त्यातच बहुतांश शेतकऱ्यांनी हरभरा विकून टाकला. यामुळे बाजारात गुणवत्तापूर्ण हरभऱ्याचा तुटवडा जाणवत आहे. परिणामी मागील पंधरा दिवसांमध्ये दरात १०० रुपयांपर्यंत सुधारणा दिसते. पण सरासरी दरपातळी ४ हजार ५०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान आहे. आणखी काही दिवस ही दरपाथली आपल्याला दिसू शकते, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

4. उडदाची आयात वाढली

देशात यंदा उडदाच्या उत्पादनात मोठी घट झाली. त्यामुळे उडदाच्या दरात तेजी आली. सध्या उडदाचे भाव ७ हजार ५०० ते ८ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. देशात भाव वाढल्याने आयातही वाढली. चालू आर्थिक वर्षात पहिल्या तीन महिन्यांमध्ये गेल्यावर्षीच्या एकूण आयातीपैकी जास्त उडीद बाजारात आला. पण उडदाचे भाव टिकून आहेत. पुढील काही दिवस उडदाचे दर तेजीतच राहू शकतात, असा अंदाज उडीद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. Tur Market

5. तूर दरातील तेजी आणखी किती दिवस टिकेल ?

देशातील बाजारात तुरीचे भाव तेजीतच आहेत. सर्वात आधी तुरीच्या भावाने सरकारची झोप उडवली. कारण सरकारने इतर शेतीमालाचे भाव आटोक्यात ठेवल्यानंतरही तुरीच्या दरातील तेजी वाढली होती. तुरीचे भाव गेल्या अनेक दिवसांपासून टिकून आहेत. सरकारने आयात करून तुरीचा पुरवठा वाढविण्याचा प्रयत्न केला. पण सरकारला त्यातही अपयश आले. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तीन महिन्यांमध्ये म्हणजेच एप्रिल ते जून या काळात दीड लाख टन आयात केली.

मागील हंगामात या काळात झालेल्या आयातीच्या तुलनेत ही आयात दुप्पट आहे. भारतात भाव वाढल्याने निर्यात देशांनीही भाव वाढवले. पण असं असातनाही भारतातून मागणी येत गेली. परिणामी एकीकडे तुरीची आयात वाढत असताना भावही टिकून राहीले. सध्या तुरीला प्रतिक्विंटल सरासरी ९ हजार ते १० हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. त्यातच चालू हंगामात आतापर्यंत तुरीची लागवड कमी झाली. लागडीचा कालावधी संपायला अगदी थोडे दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे तूर बाजाराचे लक्ष देशातील तूर लागवडीकडे आहे. देशातील तूर लागवड यंदा घटल्यास तुरीच्या दरातील तेजी नव्या हंगामातही दिसू शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

source:agrowon

Tur Market

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top