कृषी महाराष्ट्र

जमीन ट्रॅक्टरने नांगरताना काळजी कशी घ्यावी ? वाचा सविस्तर

जमीन ट्रॅक्टरने नांगरताना काळजी कशी घ्यावी ? वाचा सविस्तर

जमीन ट्रॅक्टरने नांगरताना

Ploughing : खरीप हंगाम तोंडावर असल्यामुळे सध्या जमीन मशागतीची कामे जोमात सुरु आहेत. वाढती मजुरी, मजुरांची कमतरता तसेच वेळेआभावी शेतकरी जमीन ट्रॅक्टरने नांगरण्याला प्राधान्य देतात.

पिकाची काढणी झाल्याबरोबर ज्या जमिनी नांगरता येत नाहीत, त्या वाळून कठीण बनतात. अशा जमिनी वळवाच्या पावसानंतर अगर पावसाळ्यातील पहिल्या पावसानंतर नांगरतात. उन्हाने नांगरटीत निघालेली ढेकळे ठिसूळ होतात आणि ती नंतर औताने फोडणे सोपे जाते.

नांगरटीमुळे लहान-मोठी ढेकळे निघतात, जमिनीचा पृष्ठभाग सपाट राहात नाही आणि मग पेरणी करण्यापूर्वी तिची अनेक प्रकारच्या अवजारांनी मशागत करावी लागते. नांगरट झालेल्या जमिनीत पिकाची भरपूर प्रमाणात वाढ होऊन जमिनीत मुळे खोलवर पसरतात.

दर वर्षी नांगरट केल्यामुळे काही ठरावीक खोलीवर कठीण थर निर्माण होतो. त्यामुळे पाण्याचा योग्य निचरा होत नाही. हा तयार झालेला कठीण थर सब सॉयलर नांगराने फोडावा लागतो.

नांगरट उताराला आडवी केल्याने वळवाच्या पावसाचे पाणी अडवले जाते, जमिनीत मुरते. नांगरटीमुळे निचरा न होणाऱ्या भारी, चिकण आणि रेताड जमिनीत नायट्रोजन आणि पोटॅशिअम यांचे प्रमाण वाढण्यास मदत होते. Tractor Ploughing

ट्रॅक्टरने जमीन नांगरताना घ्यायची काळजी

१) पुढच्या आणि मागच्या चाकातील अंतर समान असावे.

२) वापरात असलेली साधने जसे फाळ, हा जमिनीशी ९० अंशांत काम करणारा असावा.

३) साधा व पलटी केल्यानंतर समान खोलीवर जमिनीत चालला पाहिजे. Tractor Ploughing

४) पाळ्या घालताना वापरात असलेली पट्टी समान खोलीवरील मातीत चालली पाहिजे.

५) सर्व जागी असलेले नट व बोल्ट घट्ट असावेत.

७) ट्रॅक्टर हळू चालवूनच चांगली नांगरट शक्य आहे. काम संपण्याची घाई म्हणून जोरात चालवू नये.

८) नांगरटीत पूर्व पिकांचे सर्व शिल्लक अवशेष पूर्ण गाडले जाणे जरुरीचे आहे.

९) नांगरटीच्या वेळी जमिनीत जर कमी प्रमाणात ओल असेल तर मातीचे कण एकमेकांना जास्त शक्तींनी धरून ठेवतात. याचा परिणाम नांगरटीनंतर मोठमोठी ढेकळे तयार होतात. या ऐवजी मातीत जास्त पाणी असेल तर चिखलणी होते.

फाळाबरोबर वर येणारी माती चिकट दिसू लागते. या स्थितीत पुढे पाणी प्रमाण कमी झाल्यावर जास्त घट्टपणा येतो. मुळांना वाढीच्या काळात खोल जाण्यास अडथळा येतो.

१०) सतत एकाच खोलीवर नांगरट केल्यास जमिनीखाली एक कठीण थर तयार होतो. जो पाण्याला खालच्या थरात जाऊ देत नाही. याच कारणासाठी दोन वर्षांतून एकदा सबसॉयलरचा वापर करणे आवश्यक आहे. जमीन ट्रॅक्टरने नांगरताना जमीन ट्रॅक्टरने नांगरताना

source : agrowon

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top