कृषी महाराष्ट्र

Cotton Market | कापूस बाजारभाव किती दिवस दबावात राहणार ? वाचा संपूर्ण

Cotton Market | कापूस बाजारभाव किती दिवस दबावात राहणार ? वाचा संपूर्ण

कापूस बाजारभाव

Cotton Price : देशातील बाजारात कापसाची आवक आताही सरासरीपेक्षा जास्तच आहे. बाजारात कापूस आवकेचा दबाव अधिक असल्याने दरावरही दबाव असल्याचे जाणकार सांगतात. देशातील कापूस उत्पादनाचा अंदाज कमी होत असताना दर मात्र दबावात आहेत. कापसाला सध्या ७ हजार २०० ते ८ हजार रुपयांचा भाव मिळत आहे.

कापूस बाजाराने पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. मागील तीन दिवसांपासून कापसाच्या दरात सतत घट होत गेली. कापसाच्या वायद्याने निचांकी ७ हजार २०० ते ८ हजार रुपयांचा टप्प गाठला. कापसाचे दर दबावात असल्याने तेजीची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता वाढवली. कापसाच्या भावात सतत घसरण सुरु आहे.

कापसाच्या दराने मागील दोन महिन्यांमध्ये अपेक्षित सुधारणा दाखवली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा भ्रमनिराश झाला. शेतकऱ्यांना यंदा चांगल्या भावाची आपेक्षा होती. पण बाजारात आवकेचा हंगाम नसतानाही दरावरील दबाव कायम आहे. (Cotton Market Rate)

बाजारातील आवकेचा सध्या कापूस दरावर दबाव असल्याचे जाणकार सांगत आहेत. देशातील बाजारात सध्या दैनंदीन ७० हजार ते ८० हजार गाठींच्या दरम्यान आवक होत आहे. मे महिन्यातील ही आवक पहिल्यांदाच होत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. एरवी बाजारात मे महिन्यातील आवक १० ते १५ हजार गाठींच्या दरम्यान असते. पण यंदाची आवक अनेक वर्षातील उचांकी आहे, असे व्यापारी सांगत आहेत.

देशातील बाजारात एरवी मार्चनंतर बाजारातील कापूस आवक कमी होत जाऊन दरात सुधारणा होत असते. पण यंदा बाजारात मार्चनंतरच आवक वाढली. त्यामुळे कापसाचे बाव दबावात येत गेले. कापसाच्या भावात मार्चनंतर मोठी नरमाई दिसून आली. (Cotton Market)

कापसाचे भाव मागील दोन महिन्यांमध्ये सतत कमी होत गेले. मार्च महिन्याच्या सुरुवातील कापसाचे भाव ८ हजार ते ८ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. पण त्यानंतर दरात नरमाई येत गेली.

आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र कापसाच्या वायद्यांमध्ये दोन दिवसांपासून सुधारणा होत गेली. कापसाचे वायदे ८६.४३ सेंट प्रतिपाऊंडवर होते. काल कापसाच्या वायद्यांमध्ये तब्बल ५ टक्क्यांपर्यंत वाढले होते.

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या वायद्यांमध्ये सुधारणा झाल्याने इतर देशांना आधार मिळण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारात कापूस आणि कापडाला उठाव मिळण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर ही सुधारणा दिसली, असे जाणकारांनी सांगितले.

देशातील बाजारात पुढील काळात कापसाची आवक कमी होण्याची शक्यता आहे. कारण देशातील शेतकऱ्यांकडे कापसाचा स्टाॅक कमी प्रमाणात उपलब्ध आहे. तसेच शेतकरी कापसाची विक्री वाढवत आहेत. त्यामुळे लवकरच कापसाची आवक कमी होत जाईल. कापसाची आवक कमी झाल्यानंतर दरातही सुधारणा दिसू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. कापूस बाजारभाव कापूस बाजारभाव

source : agrowon

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top