कृषी महाराष्ट्र

अवकाळी पाऊस, गारपीटग्रस्त लिंबूवर्गीय बागेतील व्यवस्थापन कसे करावे ? वाचा संपूर्ण

अवकाळी पाऊस, गारपीटग्रस्त लिंबूवर्गीय बागेतील व्यवस्थापन कसे करावे ? वाचा संपूर्ण

अवकाळी पाऊस

Unseasonal Rain : शुक्रवार ते रविवार (ता. ७ ते ९) या काळात विदर्भात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह कमी अधिक पाऊस आणि गारपीट (Hailstorm) झालेली दिसते. अवकाळी पावसासोबत होणाऱ्या गारपिटीमुळे संत्रा, लिंबू व मोसंबी बागांचे नुकसान (Orchard Damage) झाल्याचेही अनेक ठिकाणी दिसते.

अशा स्थितीमध्ये नुकसानग्रस्त बागांची कशी काळजी घ्यावी आणि आंबिया व लिंबू बागेतील हस्त बहराचे व्यवस्थापन करण्याविषयी माहिती घेऊ.

गारपिटीमुळे झाडांची खालीलप्रमाणे हानी होते.

१) गारपिटीमुळे झाडांच्या फांद्यावरील आणि खोडावरील सालीला जखमा होतात. या जखमांतून निरनिराळ्या बुरशींचा प्रादुर्भाव झाडांना होऊ शकतो. प्रामुख्याने फायटोप्थोरा, कोलेटोट्रीकम, डिप्लोडीया, अल्टरनेरिया या सारख्या बुरशी खरचटलेल्या जखमांमधून शिरकाव करतात. पुढे त्यातून रोगांचा प्रसार वाढतो.

२) झाडाच्या पानांना मार बसल्यामुळे काही पाने फाटतात, तर काही गळतात. त्यामुळे झाडांची सूर्यप्रकाशात अन्नद्रव्य निर्मितीच्या प्रक्रियेवर परिणाम होतो.

३) झाडावरील आंबिया बहराच्या छोट्या फळांची तसेच हस्त बहराच्या लिंबू फळांची मोठ्या प्रमाणात गळ होते. Management Of Hailstorm Orchard

गारपिटीमुळे झालेल्या जखमा लवकरात लवकर भरून निघण्यासाठी पुढील उपाययोजना

– गारपिटीमुळे मोडलेल्या फांद्या आरीच्या साह्याने कापाव्यात. कापलेल्या भागावर बोर्डो पेस्ट (१:१:१०) लावावी.

– गारपीटग्रस्त झाडांच्या बुंध्यास १ मीटर उंचीपर्यंत बोर्डो पेस्ट लावावी.

– झाडाची साल फाटली असल्यास पोटॅशियम परमॅग्नेट (१ टक्के ) द्रावणाने (१०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी) स्वच्छ पुसून घ्यावी. जखमेवर बोर्डो पेस्ट (१:१:१०) लावावी.

– झाडे उन्मळून पडली असल्यास त्यांना उभे करून घ्यावे. त्यांना बांबू किंवा बल्लीच्या साह्याने व्यवस्थित आधार देऊन घ्यावा. जर झाडांची मुळे नुसतीच उघडी पडली असल्यास मातीची भर द्यावी.

– झाडांची मुळे उघडी पडली असल्यास वाफ्यामध्ये सायमोक्झॅनील अधिक मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम किंवा मेटॅलॅक्झिल अधिक मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे तयार केलेले द्रावण ८ ते १० लिटर प्रति झाड या प्रमाणात आळवणी करावी.

– त्वरित गारपीटग्रस्त झाडावर कॉपर ऑक्सिक्लोराईड ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा बोर्डो मिश्रण (६०० ग्रॅम चुना +

६०० ग्रॅम मोरचूद + १०० लिटर पाणी) या बुरशीनाशकांची फवारणी करावी. Management Of Hailstorm Orchard

– गारपीटग्रस्त झाडांना खते देऊन अन्नद्रव्ये यांचा पुरवठा करावा. त्याकरिता गारपीटग्रस्त झाडास १ किलो अमोनिअम सल्फेट प्रति झाड याप्रमाणे द्यावे. त्याच बरोबर शक्य असल्यास चिलेटेड स्वरूपातील सूक्ष्म अन्नद्रव्यांची (झिंक + कॅल्शिअम अधिक फेरस सल्फेट (संयुक्त अन्नद्रव्य घटक) २ ग्रॅम प्रति लिटर (०.२%) या प्रमाणात फवारणी करावी.

-गारपीटग्रस्त झाडांवर कॅल्शिअम नायट्रेट १ टक्का (१ किलो) + जिबरेलिक ॲसिड २ ग्रॅम प्रति १०० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. यामुळे झाडावरील पानांची संख्या वाढण्यास मदत होईल.

– आंबिया बहराची फळे गळाली असल्यास, ती गोळा करून त्यांची बागेबाहेर योग्य विल्हेवाट लावावी.

सद्यःस्थितीतील आंबिया बहर व लिंबू बागेचे नियोजन

१) सध्या आंबिया बहाराच्या बागेतील संत्रा / मोसंबीची फळे बोर ते लिंबू आकाराएवढी विकसित झालेली असतील. त्यांची वाढ निरोगी होण्याकरिता व तसेच फळांचा आकार मिळविण्याकरिता जिबरेलिक ॲसिड* १.५ ग्रॅम (१५ पीपीएम) अधिक १३:०:४५ हे खत १ किलो प्रति १०० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

२) पावसानंतर झालेल्या जखमा आणि त्यानंतर राहिलेल्या ढगाळ वातावरणामुळे आंबिया बहराच्या बागेमध्ये फळांवर बुरशींचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्याला प्रतिबंध म्हणून संपूर्ण झाडावर कॉपर ऑक्सिक्लोराईड (५० डब्लूपी) ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

४) पावसामुळे कागदी लिंबूवर खैऱ्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. त्यापासून संरक्षणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड ३ ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसीन** १ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. अवकाळी पाऊस अवकाळी पाऊस अवकाळी पाऊस अवकाळी पाऊस

संपर्क : ९८८१०२१२२२ (प्रभारी अधिकारी, अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (फळे), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.)

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top