कृषी महाराष्ट्र

भाजीपाला रोपवाटीका तयार कशी करावी ? वाचा संपूर्ण

भाजीपाला रोपवाटीका तयार कशी करावी ? वाचा संपूर्ण

भाजीपाला रोपवाटीका

Vegetable Management : भाजीपाला पिके ही हंगामी स्वरूपाची असतात. अनेक रोग व किडींना ते लागवडीपासून ते पीक काढणीपर्यंत बळी पडत असतात. रोपवाटिकेची योग्य काळजी न घेतल्यास रोपे कुमकुवत आणि रोगट होतात. अशा रोपांमुळे उत्पादनात घट होते आणि खर्चही वाढतो.

भाजीपाला पिकापैकी पालेभाज्या, गाजर, मुळा, भेंडी, घेवडा इ. बी कायम जागी लावून लागवड करतात, तर टोमॅटो, मिरची, कोबी, फ्लॉवर, कांदा यांसारख्या भाजीपाला पिकांची प्रथम रोपे तयार करून नंतर कायम जागी लावतात.

रोपे तयार करण्याचे सुद्धा एक खास तंत्र आहे. रोपवाटीका तयार करताना काय काळजी घ्यावी याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने दिलेली पाहिती पुढीलप्रमाणे.

रोपे कशी तयार करावीत ?

रोपवाटिकेकरिता हराळी, लव्हाळा किंवा इतर तण असलेली जमीन वापरू नये.

योग्य जमीन निवडल्या नंतर त्यात गुंठ्याला १ गाडी चांगले कुजलेले शेणखत टाकावे. २० ते २५ सें. मी. खोलीपर्यंत नांगारणी करून २-३ कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी.

जमीन भुसभुशीत केल्यानंतर ३ मी. लांब, १ मी रुंद व १५ ते २० से. मी. उंच आकाराचे गादी वाफे तयार करावेत. Vegetable Nursery

भाजीपाल्याचे शुद्ध आणि जातिवंत बी वापरणे उत्पादन वाढण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असते.

बियाणे चांगले नसेल तर भाजीपाल्याच्या लागवडीत इतर बाबीवर केलेला सर्व खर्च वाया जाण्याची शक्यता असते.

संकरित बियाण्याचे दर जास्त असल्याने बी टाकताना चांगली काळजी घ्यावी. वाफ्याच्या रुंदीच्या समांतर दीड सें. मी. खोलीच्या हलक्या हाताने रेघा पाडून त्यात बी पातळ पेरावे व हळुवार मातीने झाकावे. दोन ओळींतले अंतर ६ सें. मी. ठेवावे.

उन्हाळी हंगामात जमिनीचा वरचा थर कडक होऊ नये म्हणून, तसेच हिवाळ्यात आर्द्रतेत वाढ करण्यासाठी वाफ्यावर पाचट, भात, गहू पिकाचे तूस हलके पसरावे व १० ते २० टक्के मोड दिसू लागल्यावर काढावे. Vegetable Rate

बियांच्या पेरणीनंतर गादी वाफ्यांना झारीने पाणी द्यावे. बियांची उगवण होईपर्यंत आवश्यकतेनुसार सकाळी व सायंकाळी झारीने पाणी द्यावे.

बियांची पेरणी झाल्यापासून बी रुजणे, मोड येणे आणि पाने येणे या क्रिया अनुकूल वातावरण असताना पिकानुसार ६ ते ८ दिवसांत होतात. भाजीपाला रोपवाटीका भाजीपाला रोपवाटीका

source : agrowon

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top