कृषी महाराष्ट्र

राज्यात ‘मोचा’ चक्रीवादळाचा धोका वाढला : काही भागात वादळी पावसाचा इशारा

राज्यात ‘मोचा’ चक्रीवादळाचा धोका वाढला : काही भागात वादळी पावसाचा इशारा

मोचा

Weather Update: बंगाल उपसागरात सक्रिय असलेल्या मोचा चक्रीवादळाची (Cyclone Mocha) तीव्रता वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे देशातील काही राज्यात वादळीवाऱ्यासह पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.

बंगालच्या उपसागरालगत असलेल्या किनारपट्टी भागामध्ये या चक्रवादळामुळे वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मैदानी भागामध्ये तापमानात लक्षणीय वाढ होणार असल्याचा अंदाज आहे. या चक्रीवादळाचा परिणाम राज्यातही दिसून येणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले असून आज (12 मे) जमिनीवर येऊन धडकणार आहे.

मोचा चक्रीवादळाचा परिणाम आज बंगालच्या उपसागरालगत असलेल्या किनारपट्टी भागात दिसणार आहे. आज महाराष्ट्र, केरळ अरुणाचल प्रदेश आणि कर्नाटकमध्ये या चक्रीवादळामुळे वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या दोन-तीन दिवसापासून राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये तापमानात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले आहे. तर काही भागांमध्ये तापमानाचा पारा 40 ते 45 अंश सेल्सिअस दरम्यान होता. या वादळामुळे तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

source : krishijagran

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top