देशातील सर्वात उष्ण तापमानाची नोंद जळगाव जिल्ह्यात : आजचा हवामान अंदाज
उष्ण तापमानाची नोंद
Weather Update Pune : राज्यात उन्हाच्या झळा चांगल्याच वाढल्याने अनेक ठिकाणी पारा चाळिशी पार गेला आहे. गुरुवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये उत्तर महाराष्ट्रातील जळगाव येथे देशातील सर्वाधिक ४४.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.
यंदाच्या हंगामाचे राज्यातील हे सर्वोच्च तापमान ठरले आहे. आज (ता. १२) उत्तर महाराष्ट्रात उष्ण लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
कमाल तापमानाचा पारा ४० अंशापार गेला असेल आणि तापमानात सरासरीच्या तुलनेत ४.५ अंशापेक्षा अधिक वाढ झाली असेल तर त्या भागात उष्णतेची लाट आल्याचे समजले जाते. गुरुवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जळगाव येथे उष्ण लाट आली होती.
अकोला येथे ४३.५, धुळे ४२.० सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भासह राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ४० अंशांच्या पुढे गेला आहे. Heat Wave
बंगालच्या उपसागरातील ‘मोचा’ चक्रीवादळ लगत असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीपासून दक्षिण आंध्र प्रदेशापर्यंत समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
आज (ता. १२) राज्यात मुख्यतः उष्ण कोरड्या हवामानाची शक्यता आहे. कमाल तापमानातील वाढ कायम राहण्याबरोबरच, दमट आणि उष्ण हवामान अधिक त्रासदायक ठरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. Heat Wave
गुरुवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :
पुणे ४०.१ (२२.७), जळगाव ४४.६ (२१), धुळे ४२ (-), कोल्हापूर ३५.७ (२५.२), महाबळेश्वर ३०.९ (१९.५), नाशिक ४०.२ (२४.७),
निफाड ४१.२ (२२.८), सांगली ३७.३ (२५.३), सातारा ३७.८ (२३.५), सोलापूर ४०.४ (२६.४), सांताक्रूझ ३३.९ (२८), डहाणू ३५.६ (२६.४), रत्नागिरी ३४.१ (२६.७),
छत्रपती संभाजीनगर ४०.२ (२२), नांदेड ४१.४ (२६.२), परभणी ४१.६ (२६.५), अकोला ४३.५ (२३.१), अमरावती ४१.८(२२.५), बुलडाणा ३९.४ (२४.२), ब्रह्मपुरी ४०.२ (२३),
चंद्रपूर ४०.४(२४), गडचिरोली ४१.६(२५), गोंदिया ४१.२ (२१.६), नागपूर ४१.२ (२१.६), वर्धा ४१.२(२३.५), वाशीम ४० (२४.२), यवतमाळ ४०.५ (२७.२).
उष्ण लाटेचा इशारा
मध्य महाराष्ट्र : नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक. उष्ण तापमानाची नोंद
source : agrowon