कृषी महाराष्ट्र

वाळवी कीटकापासून काळजी कशी घ्यावी ? वाचा सविस्तर

वाळवी कीटकापासून काळजी कशी घ्यावी ? वाचा सविस्तर

वाळवी कीटकापासून

लाकुड कोरून खाणारे हे कीटक उधई या नावानेही ओळखले जातात. या किटकांना संस्कृत भाषेत वल्म तर इंग्रजी मध्ये टर्माइट असे म्हंटले जाते. भारतात सर्वत्र वाळवी आढळते. वाळवी हा कीटक वसाहत करून लाकडा मध्ये राहतो. दमट जागा जुन्या लाकडामध्ये वाळवीचे अस्तित्व असते.

वाळवी ही कीड खोडाची कोवळी साल कुरतडून खाते. फॉरमोसॅन सबटेरानियन टर्माईट’ या नावाने ओळखली जाणारी आशियातील वाळवीची जात वेगाने लाकुड खाते.

या उपद्रवी कीटकांमुळे दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. कीटकांना पंखांच्या दोन जोड्या असतात. वाळवीचा खाद्य म्हणूनही वापर केला जातो. ही अतिशय पौष्टिक असते.

उपायसंपादन करा

शेतातील वाळवीची वारुळे खोदून त्यातील राणी वाळवी नष्ट करावी. असे केल्याने पुढील पीढी येत नाही. तसेच वारुळात थाईल ब्रोमाईड व क्‍लोरोफॉर्म यांचे २५० मि.लि. मिश्रण प्रति वारुळात ओतावे. यामुळे वाळवी तेथे राहत नाही. निंबोळीपेड टाकल्यास वाळवीला न आवडून तेथून ती जाण्याचा प्रयत्न करते. सरडा हे प्राणी वाळवी खातात.

लाकुड कोरून खाणारे हे कीटक उधई या नावानेही ओळखले जातात. या किटकांना संस्कृत भाषेत वल्म तर इंग्रजी मध्ये टर्माइट असे म्हंटले जाते. भारतात सर्वत्र वाळवी आढळते. वाळवी हा कीटक वसाहत करून लाकडा मध्ये राहतो. दमट जागा जुन्या लाकडामध्ये वाळवीचे अस्तित्व असते.

वाळवी ही कीड खोडाची कोवळी साल कुरतडून खाते. फॉरमोसॅन सबटेरानियन टर्माईट’ या नावाने ओळखली जाणारी आशियातील वाळवीची जात वेगाने लाकुड खाते. या उपद्रवी कीटकांमुळे दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. कीटकांना पंखांच्या दोन जोड्या असतात. वाळवीचा खाद्य म्हणूनही वापर केला जातो. ही अतिशय पौष्टिक असते.

संहारक रसायने

वाळवीसाठी संहारक रसायने देशी व विदेशी बनावटीची बाजारात तयार मिळतात. खालीलपैकी कोणतेही रसायन सोईच्या पद्धतीने वापरावे.

– क्लोरपायरीफॉस २०% इसी (Chlorpyrifos 20% E.C.) – वाळवी नाशासाठी याची खास शिफारस केली जाते. रंगहीन असल्यामुळे तसेच पाणी आणि केरोसीन दोन्हींमध्ये विद्राव्य असल्यामुळे वापरण्यास उत्तम. लाकडी फर्निचरवर वापरावयाचे असल्यास केरोसीनमध्ये व भिंतीवर वापरावयाचे असल्यास पाण्यात (२%) वापरावे. अत्यंत प्रभावशाली व परिणामकारक.

– कोल्टार क्रिओसोट- हे तेल केरोसीनमध्ये ५०: ५० या प्रमाणात मिसळून फवारा आणि ब्रशने वापरतात. परंतु रंगाने काळसर असल्यामुळे पॉलिश करावयाच्या लाकडांसाठी याचा उपयोग करता येत नाही. हा याचा मुख्य दोष आहे.

– सॉलिगनम (Solignum) हेसुद्धा रंगहीन असल्यामुळे पॉलिश व पेंट केलेल्या वस्तूंवर वापरता येते.

– वोमन सॉल्ट (Wolman salt) पाण्यात मिश्रण करून ब्रश किंवा फवाऱ्याने वापरता येते.

– आस्कू (Ascu) वाळवीनाशासाठी बाजारात तयार मिळते. अरसेनिक पेन्टॉक्साइड आणि कॉपर सल्फेटचे मिश्रण पोटॅशियम अथवा सोडियम डायक्रोमेटच्या बेसवर केलेले असते.

– कॉपर नॉप्थीनेट (Coper Napthenate) रंगाने साधारण निळसर हिरवट असल्याने पेंट करायच्या वस्तूवर याचा वाळवी प्रतिबंधक म्हणून उपयोग करतात. पाण्यात मिश्रण करून ब्रश किंवा फवाऱ्याने वापरता येते.

source : krishijagran

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top