कृषी महाराष्ट्र

पपई ,केळी,टोमॅटो आणि भाजीपाला पिकावरील व्हायरस बद्दल संपूर्ण माहिती

पपई ,केळी,टोमॅटो आणि भाजीपाला पिकावरील व्हायरस बद्दल संपूर्ण माहिती

 

पपई, केळी, भाजीपाला आणि इतर पिकावर व्हायरस येऊ नये किंवा कमी यावा यासाठी पिकांची प्रतिकार क्षमता वाढवली तर ,व्हायरसवर बऱ्याच अंशी नियंत्रण मिळविता येते.त्यासाठी सर्व प्रथम आपण आपल्या जमिनीचे आरोग्य सुधारले पाहिजे.पीकांची प्रतिकार क्षमता/ताकद वाढवण्या साठी सर्वप्रथम जमिनीच्या आरोग्य व्यवस्थापनाकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे.

एकदा का जमिन ताकदवर, जिवंत व कसदार झाली की पिकांची प्रतिकारशक्ती वाढून उत्पादन खर्च कमी होवून एकंदरीत उत्पादन-उत्पन्न यांत नक्कीच वाढ होते.त्यासाठी शेतकऱ्यांनी अतिशय नियोजन पूर्वक शेती केली पाहिजे .पीक मग ते कोणतेही असो तो सुद्धा एक जीव आहे, माणसाला जसे सर्व प्रकारची प्रथिने आणि वेगवेगळ्या जीवन सत्वांची आवश्यकता असते,त्याप्रमाणेच पिकानाही ,वेगवेगळ्या प्रकारच्या अन्नद्रव्यांची आवश्यकता असते.

1)वायू : कार्बन,हायड्रोजन, ऑक्सिजन 2)मुख्य अन्नद्रव्ये नत्र ,स्फुरद,पालाश ,3)दुय्यम अन्न द्रव्ये कॅल्सियम, मॅग्नेशियम, सल्फर ,4)आणि 7 प्रकारची सूक्ष्म अन्न द्रव्ये,असे एकूण 16 घटक पिकाचे चांगले उत्पन्न घेण्यासाठी आवश्यक असतात, त्यासाठी सर्व प्रकारच्या खतांची संतुलित मात्रा, वेळेवर देणे आवश्यक असते .पपई,केळी पिकात आपण 2/3 महिने कालावधीची अंतर पीकही घेतो त्यासाठी खते वेळेवर देणे अत्यन्त गरजेचे आहे.

खते दिल्यावर त्यांचा पाण्याशी संपर्क झाल्यावर लागण्याचा कालावधी विचारात घेऊन योग्य वेळी, योग्य प्रमाणात आणि योग्य तीच खते दिली पाहिजे,त्यामुळे पिकांची प्रतिकार क्षमता वाढुन निश्चितच रोग कमी पडतात. त्यासाठी खतांचा बेसल डोस देणे अत्यन्त गरजेचे आहे.

रोग कमी पडतात.कॅल्सियम नायट्रेट कोणत्याही फॉस्फेटिक खता सोबत देऊ नये ते स्वतंत्र द्यावे.
मित्रानो आपण म्हणतो वेळेलाच केळे लागते, खतांची योग्य वेळ साधली तर पिकाची प्रतिकार क्षमता वाढून ,रोगांचे प्रमाण आपण कमी करू शकतो, पण बऱ्याच वेळा आपण खते वेळेवर देत नाहीत , खते दिल्यावर ती मातीने झाकून टाकली पाहिजे.

आपण खते देत नाही ती फेकतो,खते उघड्यावर पडल्यामुळे युरिया सारख्या घटकाचे बाष्पीभवन होऊन हवेत उडून जातो,अतिपाण्यामुळे युरिया स्फुरद ,पालाश सल्फर जमिनीत खोल झिरपून जाते ,या सर्व गोष्टींचा विपरीत परिणाम झाल्यामुळे पीक कुपोषित होते ,आणि अशा पिकावर रोगांचे प्रमाणही वाढते.

बरेच शेतकरी युरियाचा अतिरिक्त वापर करतात ते चुकीचे आहे, त्यामुळे आपण आपल्या पिकावर रोग पडण्यासाठीची तयारी करून देतो, पहिल्या पासून पिकावर जहाल अशा कीटक नाशकांची फवारणी करून मित्र कीटक मारून टाकतो,त्यामुळे पिकांवर रोग जास्त पडतात.

त्यासाठीच लागवडी पासून जहाल अशा किटकनाशके फवारू नये,सेंद्रिय किंवा जैविक कीटकनाशके वापरून, मित्र किळ संख्या वाढू द्यावी.नैसर्गिरित्या रसशोषक किडींचे नियंत्रण होऊ द्यावे. केळी ,पपई , भाजीपाला आणि इतर पिकावर पडणारे विषाणूजन्य रोग /व्हायरस म्हणजे पिकाच्या पेशीत राहणारे सुक्ष्मजीव असतात. पिकावरिल व्हायरस एखाद्या छिद्रातून किंवा पिकाला झालेल्या जखमेतून पिकाच्याआत प्रवेश करतात.

source : krishijagran

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top