कृषी महाराष्ट्र

कांदा काढताना काळजी कशी घ्यावी ? वाचा संपूर्ण माहिती

कांदा काढताना काळजी कशी घ्यावी ? वाचा संपूर्ण माहिती

कांदा काढताना काळजी

कांदा लाऊन 70/75 दीवस झाले आहे कांदा फुगवण कशी करावी हे पुर्वी सांगितले आहे. आता काढणेचे आधी वेस्ट डीकाॅमपोजर ठीबक मधुन सोडावे , सरी,वाफे असेल तर पाईपमधून वहेनचुरीतुन एकरी दोनशे लिटर द्रावण दोन वेळा सोडावे. तसेच पिकांवर पंपातुन फवारणी करावी पांच लिटर द्रावण व दहा लिटर पाणी घ्यावे.

वेस्ट डीकाॅमपोजर मधील जिवाणू मुळे जमिन भुसभूशीत होऊन कांदा लवकर उपटला जाईल. कांदा पात कापतांना एक इंच पात ठेऊन कापावी. जोड,टेगंळा कांदा बाजुला काढावा रोगाच्या साथीमुळे ज्यास्त मजुर लाऊन नये. कांदे सावली त वाळवावे जमिनीवर कडुनिंबचा पाला अंथरुन त्यावर कांदे पसरावे.

जोड टेगंळा कांदा आधी विक्री करावा बाजारभाव पाहून थोडा थोडा कांदा विकावा. पुर्वी सांगितले नुसार चाळीत कांदा भरतांना जुन्या पी व्ही सी पाईप ला छिद्र पाडुन उभे आडवे टी ने जोडुन पाईप प्रत्येक थरावर ठेवावे एकझास फॅन लावण्याची व्यवस्था करावी. कांदे चाळीतील हवा बाहेर जायला पाहिजे म्हणजे कांदा सडत नाही ज्यास्त दिवस टिकतो.

सध्या कांद्याला चांगला भाव सोडा आगदी बाजारात कांदे विकायला सुद्धा परवडत नसल्याचे चित्र आहे. यंदा ‘वांदा’ केल्याने कांदा उत्पादक शेतकरी ( Farmer ) अडचणीत सापडला असताना, नंदुरबार जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा फटका बसला आहे.

जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या गाव असलेल्या सैताने गावातील शेतकऱ्यांना गारपीठ आणि अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे.कांद्याला भाव मिळत नसताना अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जेरीस आणले आहे.

source : krishijagran

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top