कृषी महाराष्ट्र

Organic Farming : जैविक निविष्ठांचा वापर कसा करावा ? वाचा सविस्तर

Organic Farming : जैविक निविष्ठांचा वापर कसा करावा ? वाचा सविस्तर

 

Organic Farming : सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये जैविक निविष्ठांचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे बीजप्रक्रियेसाठी, सेंद्रिय खताद्वारे जमिनीत देण्यासाठी, फवारणीद्वारे देण्यासाठी, द्रावणाचे ड्रेचिंग करण्यासाठी, ठिबक अथवा स्प्रिंकलरने व्हेंचुरीद्वारे देण्यासाठी सुद्धा करता येतो. या जैविक निविष्ठा कोणत्या आहेत याबद्दलची माहिती घेऊया.

रायझोबिअम कल्चर –

१) बियाणे प्रक्रिया – २५ मिलि प्रति किलो बियाणे

२) ठिबकद्वारे – २ लिटर प्रति एकर व्हेंच्युरीद्वारे.

३) ड्रेचिंग – ५०० मिलि / २०० लिटर पाण्यात / एकर.

४) साध्या फवारणी पंपाचे नोझल काढून अथवा नोझल ढिले करून द्रावणाची चूळ भरावी किंवा नोझलला प्लॅस्टिकचे हूड लावून केवळ पिकाच्या ओळीवर शेतात दाट फवारणी करावी.

५) शेणखताद्वारे – २ लिटर + ५० किलो शेणखत जमिनीत ओल असताना पेरणीपूर्वी द्यावे व योग्य प्रकारे जमिनीत मिसळून घ्यावे.

६) उपयोग – दाळवर्गीय पिकांना नत्राची उपलब्धता वाढविण्यासाठी. Organic Farming

ॲझोटोबॅक्टर कल्चर –

१) बियाणे प्रक्रिया – २५ मिलि प्रति किलो बियाणे.

२) ठिबकद्वारे – २ लिटर प्रति एकर व्हेंचुरीद्वारे

३) ड्रेचिंग – ५०० मिलि / २०० लिटर पाण्यात / एकर

४) साध्या फवारणी पंपाचे नोझल काढून अथवा नोझल ढिले करून द्रावणाचे ड्रेंचिंग करावे किंवा नोझलला प्लॅस्टिकचे हूड लावून केवळ पिकाच्या ओळीवर शेतात दाट फवारणी करावी.

५) शेणखताद्वारे – २ लिटर + ५० किलो शेणखतात योग्य प्रकारे मिसळून, जमिनीत ओल असताना पेरणीपूर्वी द्यावे.

६) उपयोग – दाळवर्गीय पिकांव्यतिरीक्त इतर सर्व पिकांना नत्राची उपलब्धता वाढविण्यासाठी

पीएसबी कल्चर –

१) बियाणे प्रक्रिया – २५ मिलि प्रति किलो बियाणे.

२) ड्रेचिंग – ५०० मिलि / २०० लिटर पाण्यात / एकर

३) साध्या फवारणी पंपाचे नोझल काढून अथवा नोझल ढिले करून द्रावणाची चूळ भरावी किंवा नोझलला प्लॅस्टिकचे हूड लावून केवळ पिकाच्या ओळीवर शेतात दाट फवारणी करावी.

४) ठिबकद्वारे – २ लिटर प्रति एकर व्हेंचुरीद्वारे

५) शेणखताद्वारे – २ लिटर + ५० किलो शेणखत, जमिनीत ओल असताना पेरणीपूर्वी देऊन जमिनीत योग्य प्रकारे मिसळून घ्यावे.

६) उपयोग – सर्व प्रकारच्या पिकांना स्फुरदची उपलब्धता वाढविण्यासाठी. Organic Farming

ट्रायकोडर्मा –

१) बियाणे प्रक्रिया – १० मिलि प्रति किलो बियाणे.

२) जमिनीत देण्यासाठी – १ ते १.५ किलो / लिटर ट्रायकोडर्मा + ५० किलो शेणखत प्रति एकर पेरणीपूर्वी.

३) पुनर्लागवडीसाठी रोप प्रकिया – ५०० मिलि प्रति ५ लिटर पाण्यात या प्रमाणे द्रावणामध्ये रोपांची मुळे भिजवून पुनर्लागवड करावी.

४) उपयोग – मर, मूळकुज, सूत्रकृमींच्या व्यवस्थापनासाठी.

स्युडोमोनास –

१) बियाणे प्रक्रिया – १० ग्रॅम अथवा १० मिलि प्रति किलो बियाणे

२) जमिनीत देण्यासाठी – १ ते १.५ किलो/ लिटर स्युडोमोनास+ ५० किलो शेणखत प्रति एकर पेरणीपूर्वी.

३) उपयोग – पानांवरील रोग, मूळकुज, सूत्रकृमींच्या व्यवस्थापनासाठी

माहिती आणि संशोधन – जितेंद्र दुर्गे, श्री शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती.

Organic Farming

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top