कृषी महाराष्ट्र

प्रॉपर्टी जुना ७/१२, जुने फेरफार नोंदवही, कागदपत्रे ऑनलाइन कशे बघावे ?

प्रॉपर्टी जुना ७/१२, जुने फेरफार नोंदवही, कागदपत्रे ऑनलाइन कशे बघावे ?

प्रॉपर्टी जुना ७/१२

कधी-कधी आपल्या कडून जमिनीची जुनी कागद पत्रे हरवून जाता किंवा ती खूप जुनी असल्यामुळे आपल्याला त्यांना सांभाळून ठेवणे खूप कठीण होऊन जाते व ती खराब होऊन जाता. जर का तुम्हाला कुठल्याही कारणास्तव old 7/12 utara आणि 7/12 old ferfar हि कागद पत्रे हवी असल्यास तुम्ही हि कशी प्राप्त करू शकता हे आपण ये लेखात बघणार आहोत.

जमिनीची सर्व रेकॉर्डस् हे शासनाने सांभाळून ठेवलेले असते. भलेही ही कागदपत्रे कितीही जुनी असुद्या ती वर्षवार नुसार एका क्रमाने शासनाने जपून ठेवलेली असतात. जर का तुम्हाला तुमच्या परिवारा कडे पूर्वी किती जमीन होती किंवा जुना ७/१२ आणि जुने फेरफार तुम्हाला भघायचे असल्यास तुम्ही ते Online Ferfar Utara भघु शकता.

Maharashta शासनाने सर्व जुने 7/12 Ferfar आणि june ferfar Online पोर्टल वर उपलब्ध करून दिले आहे. आता तुम्ही जमिनीचे हे जुने रेकॉर्डस् (7/12 old records) ऑनलाइन बघू शकाल.

पोर्टलAaple Abhilekh
(आपले अभिलेख)
कशासाठी(जुन्या जमिनीच्या कागदपत्रांसाठी)
Old Mutation, Old Satbara, 8A,
e ferfar Download, Property Card/
And Many More Documents
अधिकृत वेबसाइटaapleabhilekh.mahabhumi.gov.in

Notes –

  • Old 7/12 Maharashtra आणि जुनी जमिनीची कागदपत्रे ही काही निवडक शहरांसाठीच उपलब्ध आहे.
  • जर का तुमचे ठिकाण किंवा जुनी कागदपत्रे हे या पोर्टल वर उपलब्ध नसेल तर तुम्ही तुमच्या विभागाच्या महसूल कार्यालयात जाऊन अर्ज करून ती काढू शकता.

Aaple Abhilekh वर जुना ७/१२ व इतर जुनी कागदपत्रे कशी बघावी?

शासनाने जुने ७/१२ आणि जुने फेरफार online बघण्यासाठी Aaple Abhilekh हे पोर्टल चालू केले आहे. Mahabhulekh Ferfar Online या पोर्टल वर तुम्ही तुमच्या जमिनीची जुनी कागदपत्रे बघू शकता.

या पोर्टल वर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती, घरचा पत्ता आणि लॉगिन ची माहिती देऊन Registration करून Login करून घ्यावे लागेल.

त्यानंतर तुम्ही तुमच्या जमिनीच्या ठिकाणची माहिती देऊन तुम्हाला हवे ते जुने रेकॉर्ड निवडा जसे कि Old 7/12 Extract (जुने ७/१२) आणि Old Mutation (जुने फेरफार) नाहीतर इतर जुने भूमि अभिलेख फेरफार रेकॉर्डस् आणि search या बटनावर क्लिक करा.

तुम्ही दिलेल्या माहिती नुसार तुमच्या स्क्रीन वर काही search results येतील त्यात तुम्हाला जुने ७/१२ आणि फेरफार नंबर year wise दिसतील त्यात तुम्हाला जे हवे त्याला Add to Cart करा आणि नंतर Cart मध्ये जाऊन Download Available Files या बटनावर क्लिक करा.

शेवटी ती file ओपन करा आणि तुमचा जुना ७/१२ किंवा जुने फेरफार उतारा बघा. या फाईल ची प्रिंट सुद्धा तुम्ही काढू शकता.

https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/erecords

नोट –

  • जर का काही कारणास्तव तुमचे जुने ७/१२ आणि जुने फेरफार या पोर्टल वर उपलब्ध नसतील तर तुम्ही तुमच्या भूमि अभिलेख विभागाला जाऊन जुन्या जमिनीच्या कागद पत्रांसाठी अर्ज करा.
  • मात्र या ऑफलाईन पद्धतीमध्ये तुम्हाला जुने रेकॉर्डस् मिळायला वेळ लागतो कारण कागदपत्रे शोधून ती द्यावी लागतात.

जुने फेरफार आणि ७/१२ ऑनलाइन कसा मिळेल?

आपले अभिलेख पोर्टलवर तुम्ही जुने ७/१२ आणि जुने फेरफार मिळवू शकता. तुमच्या जमिनीच्या जुन्या नोंदी ऑनलाइन शोधण्यात आम्ही तुम्हाला मदत करू.

source : mahabhulekh

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top