कृषी महाराष्ट्र

Farm Pond Subsidy : शंभर टक्के अनुदान मिळणार सामुदायिक शेततळ्यासाठी

Farm Pond Subsidy : शंभर टक्के अनुदान मिळणार सामुदायिक शेततळ्यासाठी

Farm Pond Subsidy

अनिश्चित पावसामुळे कोरडवाहू क्षेत्रातील पूर्णतः पावसावर अवलंबून असलेल्या पिकांवर त्याचा विपरीत परिणाम होतो.

पाण्याच्या टंचाईमुळे आणि पावसात पडलेल्या खंडामुळे पिकांचे नुकसान होऊ नये, यासाठी शासनाच्या विविध शेततळे योजना राबविल्या जातात.

अशीच एक योजना शासनाने हाती घेतलेली आहे. या योजनेंतर्गत सामुदायिक शेततळ्यासाठी (Farmpond) १०० टक्के अनुदान (Subsidy) मिळणार आहे.

या योजनेचे निकष काय आहेत याशिवाय कोण घेवू शकतो या योजनेचा लाभ याविषयीची माहिती पाहुयात.

आवश्यक कागदपत्रे कोणती व अर्ज कुठे करावा ?

सामुदायिक शेततळे नोंदणीसाठी ७/१२ उतारा, ८-अ प्रमाणपत्र आवश्यक आहे. तसेच इच्छुक शेतकर्‍यांनी https://mahapocra.gov.in/  या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी व अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.

पात्रता व अटी काय आहेत ?

ग्राम कृषि संजीवनी समितीने मान्यता दिलेले शेतकरी समूह या योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र असणार आहे. सामुदायिक शेततळे हे दोन किंवा अधिक शेतकरी लाभार्थ्याने करणे आवश्यक असणार आहे.

लाभार्थी समूहाकडे जेवढे क्षेत्र असेल, तेवढ्या क्षेत्रासाठी आवश्यक क्षमतेचे सामुदायिक शेततळ्याचा लाभ त्या संबंधित शेतकरी समूहाला घेता येईल.

सामुदायिक शेततळ्यातील पाणी वापराबद्दल तसेच शेततळ्याच्या जमिनीबद्दल शेतकरी लाभार्थींमध्ये आपसामध्ये सामंजस्याचा करार करणे आवश्यक असणार आहे.

लाभ घेण्यासाठी अर्ज करणारे शेतकरी संयुक्त कुटुंबातील नसावेत, ते वेगवेगळ्या कुटुंबातील असावेत. त्यांचे जमीन धारणेबाबतचे खाते उतारे स्वतंत्र असणे आवश्यक आहेत.

कशी होणार अंमलबजावणी ?

शेतकरी समूहाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी  https://mahapocra.gov.in/  या संकेत स्थळावर ऑनलाईन नोंदणी व अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.

पूर्वसंमती मिळाल्यापासून 60 दिवसाच्या आत काम पूर्णकरून घ्यावे लागेल अन्यथा पूर्वसंमती आपोआप रद्द होईल याची नोंद घ्यावी.

तसेच कृषी सहाय्य्क किंवा कृषी पर्यवेक्षक यांच्याकडून शेततळे उभारण्याच्या निकषाबद्दल सूचनांचे मार्गदर्शन घेतल्यानंतरच कामाला सुरुवात करायची आहे.

लाभार्थी समूहाने स्वतः स्वखर्चाने प्रथम शेततळ्याचे काम मार्गदर्शक सूचनांमध्ये दिलेल्या आराखड्याप्रमाणे व तांत्रिक निकषाप्रमाणे प्रकल्पाचे काम पूर्ण करून घ्यावे. तसेच कामासाठी कोणतीही आगाऊ रक्कम दिली जाणार नाही.

खोदकाम झाल्यावर प्लास्टिक अस्तरीकरण शेततळ्याच्या आतील बाजूने शेतकरी समूहाने करून घ्यावे. सेवा पुरवठादाराकडे बिलाच्या छायांकित प्रति शेतकर्‍याने स्वतःची स्वाक्षरी करून साक्षांकित करून ऑनलाईन संकेतस्थळावर अपलोड कराव्यात. मंजूर आकारमानापेक्षा मोठे शेततळे शेतकर्‍याने केल्यास

Source: agrowon.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top