कृषी महाराष्ट्र

IMD Alert – ऑक्टोबर महिन्यात कोसळणार मुसळधार पाऊस !

IMD Alert – ऑक्टोबर महिन्यात कोसळणार मुसळधार पाऊस !

 

IMD Alert: देशात आणि राज्यात अनेक दिवसांपासून मान्सूनचा (Monsoon) पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नद्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर काही भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. ऑक्टोबर महिन्यात देखील मुसळधार पावसाचे (Heavy Rain) सत्र सुरूच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

ऑक्‍टोबर महिना सुरू झाला, असला तरीही मान्सून कोसळतच आहे. भारतातील (India) अनेक राज्यांमध्ये अजूनही ढग दाटून येत आहेत. हवामान खात्याच्या (IMD) मते, अशी काही कारणे समोर आली आहेत, ज्यामुळे मान्सूनच्या परतीला उशीर होऊ शकतो.

महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक जिल्हे मुसळधार पावसाने भिजले आहेत. अशा परिस्थितीत मान्सूनच्या ताज्या सक्रियतेमुळे देशातील कोणत्या राज्यांमध्ये सतत आणि मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

‘ऑक्टोबरमध्येही मान्सून सक्रिय’

हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, ‘नूरू’ या सुपर चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरावर (Bay of Bengal) चक्रीवादळ (Hurricane) निर्माण झाल्यामुळे नैऋत्य मान्सून देशातून माघार घेण्यास विलंब होत आहे.

मान्सूनला उशीर झाल्यामुळे तो आता सक्रिय राहणार आहे. त्यामुळे 5 ऑक्टोबरपासून उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान, मध्य प्रदेश, दिल्ली आणि हरियाणाच्या काही भागात पावसाची नवीन फेरी सुरू होण्याची शक्यता आहे.

या राज्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा

हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार, 2 ऑक्टोबर रोजी आसाम अंदमान आणि निकोबार बेटांसह आणि मेघालय आणि नागालँड, मणिपूर येथे अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मिझोराम आणि त्रिपुरा मध्येही पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे.

श्रोत :- marathi.krishijagran.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top