कृषी महाराष्ट्र

यंदा रब्बी हंगामात वाल, कलिंगड पिकांच्या लागवडीकडे जास्त कल

यंदा रब्बी हंगामात वाल, कलिंगड पिकांच्या लागवडीकडे जास्त कल

रब्बी हंगामात

हिवाळ्यात वालाच्या पिकाला पोषक वातावरण तयार होत असते. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह या व्यवसायावर होत असल्याने आणि तालुक्यात वालांच्या ओल्या शेंगांना भरपूर मागणी असल्याने शेतकरी हे पीक मोठ्या प्रमाणावर घेतात.

माणगाव, जि. रायगड : तालुक्यातील शेतकरी भातशेती (Paddy Farming) करतानाच शेतीला पूरक व्यवसाय म्हणून तालुक्यातील शेतकऱ्यांचा वाल, भाजीपाला, कलिंगड पिकांच्या लागवडीकडे (Watermelon Cultivation) जास्त कल असतो. त्यात कलिंगडाचे पीक मोठ्या प्रमाणावर येते. जिल्ह्यातून, तसेच मुंबई, ठाणे, पुणे येथून व्यापारी खरेदीसाठी येतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढत असल्याने ते आनंदित आहेत.

हिवाळ्यात वालाच्या पिकाला पोषक वातावरण तयार होत असते. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह या व्यवसायावर होत असल्याने आणि तालुक्यात वालांच्या ओल्या शेंगांना भरपूर मागणी असल्याने शेतकरी हे पीक मोठ्या प्रमाणावर घेतात. जशी थंडी वाढत जाते, तसे ओल्या शेंगांना मागणी वाढते.

याच दरम्यान, खवय्ये पोपटी लावतात. पोपटीत अंडी व कोंबडीचे मांस मसाला लावून मडक्यात शेंगाबरोबर भाजले की, त्याची चवच वेगळी असते. माणगाव तालुक्यात इंदापूर, मोरबा, गोरेगाव; तसेच माणगावजवळील मोरबा रोड, बामणोली, निळगून या भागात कलिंगडाची आणि विविध प्रकारच्या भाज्यांची लागवड केली जाते, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न आणि स्थानिकांना रोजगार मिळत आहे.

तरुण शेतकरी सक्रिय

पावसाळा संपल्यानंतर काही दिवसांनी शेतकरी वालाच्या शेंगा, विविध प्रकारच्या भाज्या; त्याचप्रमाणे कलिंगडाच्या लागवडीसाठी तयारीला लागतात. तालुक्यात विविध भागांत कलिंगड आणि वालाच्या शेंगांची लागवड पूर्ण केली आहे. ही पिके घेण्यासाठी तरुण शेतकरी मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहेत.

source : agrowon

watermelon cultivation,watermelon,watermelon farming,black watermelon cultivation,how to grow watermelon,cultivation of watermelon,watermelon cultivation advice,watermelon cultivation in telugu,seedless watermelon cultivation,growing watermelon,cultivation,growing watermelons,watermelon fruit cultivation,watermelon farming in india,watermelon cultivation methodsवाल,वाल लागवड,वाल नियोजन,वाल लागवड व उत्पादन,वाल छाटणी पद्धत,वाल लागवड पद्धत,वाल लागवड कशी करावी,वाल फवारणी,वाल उत्पादन,वाल लागवड संपूर्ण माहिती,वाल पावटा लागवड,वाल शेती नियोजन,वाल लागवड माहिती,कलिंगड,कलिंगड लागवड,कलिंगड लागवड कशी करावी,कलिंगड शेती,कलिंगड लागवड संपूर्ण माहिती,कलिंगड लागवड माहिती,कलिंगड माहिती,कलिंगड लागवड पद्धत,कशी करावी कलिंगड लागवड,कलिंगड लागवड विषयी माहिती,कलिगड,कलिंगड बेसल डोस

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top