कृषी महाराष्ट्र

गाईच्या दूध दरात 2 रुपयांची वाढ ? पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा निर्णय

गाईच्या दूध दरात 2 रुपयांची वाढ ? पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा निर्णय

गाईच्या दूध दरात

गेल्या काही दिवसांपासून दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना अच्छे दिन आले आहेत. आता पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने गायीच्या दुधाच्या खरेदी आणि विक्री दरात प्रतिलिटरला दोन रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत इंधनांच्या दरात झालेली वाढ, पशुखाद्यांचे वाढलेले दर यामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकर्‍यांना मदत करण्याच्या हेतूने संघाने दूध खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती दूध संघाच्या चेअरमन केशरताई पवार यांनी दिली.

असे असताना म्हशीच्या दूध खरेदीदरात वाढ न करता विक्रीदरात दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. हे दर 1 फेब्रुवारीपासून नवीन दरवाढ लागू होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

याआधी कात्रज दूध संघाकडून गायीच फॅट आणि 8.5 एसएनएफ गुणप्रतीच्या दुधाचा खरेदी दरलिटरला 35 रुपये होता. तो दोन रुपयांनी वाढवून 37 रुपये करण्यात आला आहे. शेतकर्‍यांना वाजवी दर देताना ग्राहकांवर दूध दरवाढीचा बोजा टाकण्यात आला आहे.

दरम्यान, डेअर्‍यांकडे संकलन वाढल्याने संघाचे दूध संकलन घटू लागले. त्यामुळे दूध खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. कात्रज दूध संघाचे रोजचे दूध संकलन देखील कमी झाले आहे.

दुधाळ जनावरांना समतोल आहार (Balanced Diet For Milch Animal) देणे आवश्‍यक आहे. यासाठी परिपूर्ण आहाराचे नियोजन (Animal Diet Management) केले पाहिजे, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्रातील विषय तज्ज्ञ डॉ. गोपाल मंजुळकर यांनी केले.

बाळापूर तालुक्यातील सातरगाव येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषी विभागाच्या (Agricultural Department) वतीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. मुरली इंगळे, प्रकल्प संचालक (आत्मा) आरीफ शाह यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी सरपंच शिवदास पांडे, ‘आत्मा’चे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व्ही. एम. शेगोकार, मंडळ कृषी अधिकारी शिवाजी जाधव, दत्तात्रय काळे, कृषी सहायक गोपाल राऊत, माजी सरपंच सारंगधर सुर्वे, महादेव तांबडे, संतोष कसुरकार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

डॉ. मंजुळकर यांनी जनावरांसाठी समतोल आहारामध्ये ओला चारा, कोरडा चारा आणि खुराक यांचा योग्य प्रमाणात वापर महत्त्वाचा असल्याचे सांगितले.

जनावरांना ओला चारा देताना एकदल आणि द्विदल वर्गातील चाऱ्याचे मिश्रण करावे. एकदल वर्गातील चाऱ्यामध्ये मका, ज्वारी, बाजरी, पॅरा गवत, नेपियर गवत, धारवाड हायब्रीड नेपिअर-६ इत्यादींचा समावेश होतो.

एकदल चाऱ्यामध्ये प्रथिने कमी प्रमाणात आणि पिष्टमय पदार्थ अधिक असतात. चवळी, लूसणघास, बरसिम, स्टायली, दशरथ गवत या द्विदल वर्गातील चारा पिकात कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असते.

जनावरांचे आरोग्य व्यवस्थापन, शेतीपूरक जोडधंदे याविषयीही त्यांनी माहिती दिली. श्री. शेगोकार यांनी हरभरा, गहू पिकांचे व्यवस्थापन व उन्हाळी तीळ लागवड, व्यवस्थापनाविषयी सविस्तर माहिती दिली.

source: krishijagran.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top