कृषी महाराष्ट्र

दुधाळ जनावरांसाठी समतोल आहाराची गरज ! वाचा संपूर्ण माहिती

दुधाळ जनावरांसाठी समतोल आहाराची गरज ! वाचा संपूर्ण माहिती

दुधाळ जनावरांसाठी

अकोला : दुधाळ जनावरांना समतोल आहार (Balanced Diet For Milch Animal) देणे आवश्‍यक आहे. यासाठी परिपूर्ण आहाराचे नियोजन (Animal Diet Management) केले पाहिजे, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्रातील विषय तज्ज्ञ डॉ. गोपाल मंजुळकर यांनी केले.

बाळापूर तालुक्यातील सातरगाव येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषी विभागाच्या (Agricultural Department) वतीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. मुरली इंगळे, प्रकल्प संचालक (आत्मा) आरीफ शाह यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी सरपंच शिवदास पांडे, ‘आत्मा’चे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व्ही. एम. शेगोकार, मंडळ कृषी अधिकारी शिवाजी जाधव, दत्तात्रय काळे, कृषी सहायक गोपाल राऊत, माजी सरपंच सारंगधर सुर्वे, महादेव तांबडे, संतोष कसुरकार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

डॉ. मंजुळकर यांनी जनावरांसाठी समतोल आहारामध्ये ओला चारा, कोरडा चारा आणि खुराक यांचा योग्य प्रमाणात वापर महत्त्वाचा असल्याचे सांगितले.

जनावरांना ओला चारा देताना एकदल आणि द्विदल वर्गातील चाऱ्याचे मिश्रण करावे. एकदल वर्गातील चाऱ्यामध्ये मका, ज्वारी, बाजरी, पॅरा गवत, नेपियर गवत, धारवाड हायब्रीड नेपिअर-६ इत्यादींचा समावेश होतो.

एकदल चाऱ्यामध्ये प्रथिने कमी प्रमाणात आणि पिष्टमय पदार्थ अधिक असतात. चवळी, लूसणघास, बरसिम, स्टायली, दशरथ गवत या द्विदल वर्गातील चारा पिकात कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असते.

जनावरांचे आरोग्य व्यवस्थापन, शेतीपूरक जोडधंदे याविषयीही त्यांनी माहिती दिली. श्री. शेगोकार यांनी हरभरा, गहू पिकांचे व्यवस्थापन व उन्हाळी तीळ लागवड, व्यवस्थापनाविषयी सविस्तर माहिती दिली.

कृषी विज्ञान केंद्राचे विषयज्ञ डॉ. गजानन तुपकर, दत्तात्रय काळे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी शंकर कसुरकार, अमोल मसने व गावातील शेतकऱ्यांनी परिश्रम घेतले.

हिरवा चारा

हिरव्या चाऱ्यामध्ये पाण्याचा अंश जास्त असतो. हिरवा चारा जनावरांना चिवस्ट लागतात. खुराकामध्ये अन्नघटक व उर्जा जास्त प्रमाणत असल्यामुळे याचा दुधावर चांगला परिणाम होतो. पशुला खाद्य देताना खालील बाबीचा विचार करावा :

खाद्यातील पाण्याचा अंश किती आहे.
पचन होईल अशा खाद्यचा अंश:- चारा : ४०-५५%, पेंड :८०-९०% ,धान्य :७०-९०%
पौष्टिक गुण, आवश्यक असणारी पोषकतत्त्वे पहावे.
चव व स्वाद कि ज्यामुळे जनावरांना खाद्य आवडेल.
विशिष्ट प्रथिने,जीवनसत्त्वे इ. ने त्यांची प्रकृती सुधारेल /आरोग्य राखले जाईल.

वाळलेला(सुका) चारा

डोंगराळ व वनांसाठी आरक्षित जागेमध्ये वाळलेले डोंगरी गवत, भाताचा पेंढा किंवा गव्हाचे काड कापून साठवून ठेवले जातात. काही ठिकाणी कडबा साठवून ठेवला जातो. हे गवत मुखत्वे हिवाळ्यात व उन्हाळ्याच्या सुरुवातीला वापरण्यात येते. ह्या वाळलेल्या गवतात पोषकतत्त्वे कमी प्रमाणात असतात. अश्या चाऱ्याला युरिया, मिठ, मिनरल मिक्शर, व गुळ याची प्रक्रिया करून त्याचे पोषण मूल्य सुधारले जाऊ शकतात. ज्यामुळे जनावरांना ज्यावेळी हिरवा चार उपलब्ध नसेल अशावेळी पुरेसा पौष्टिक चारा मिळेल व चा-याची कमतरता भासणार नाही.

सुक्या चा-यावरती प्रक्रिया करण्याची गरज

सुक्या चाऱ्याला चव नसल्यामुळे जनावरे बराचसा भाग खात नाहीत व तो वाया जातो.
काही चा-यास बारिक धारदार काटे असतात ते जनावरांना खाताना तोंडाला कापतात व तोंडातील सुक्ष्म भागांना जखमा होतात.
पावसाळा संपल्यानंतर जनावराना हिरव्या चाऱ्याची कमतरता भासते,अश्यावेळी सुक्या चा-यावरती अवलंबुन रहावे लागते.परंतु या चा-यामध्ये जनावरांसाठी आवश्यक पोषकतत्त्वे,प्रथिने,जीवनसत्त्वे पाहीजे त्याप्रमाणात मिळत नाहीत.

खुराक

खुराकामध्ये ऊर्जा भरपुर प्रमाणात असते, म्हणून उत्पादन आहारासाठी याचा वापर होतो. हिरवा चारा जसे घास ,हिरवी मका,गवत, उसाचे वाढे या खाद्यामध्ये पाण्याचा अंश जास्त असतो ही खाद्ये जनावरांना खाण्यासाठी चिवस्ट लागतात.तसेच खुराकात म्हणजेच साखर काढल्यानंतरची मळी, तेल काढल्यानंतरची पेंड,भरडा यांमध्ये अन्नघटक (प्रथिने) व ऊर्जा जास्त प्रमाणात असतात, यामुळे दुधाच्या उत्पादनावर चांगला परिणाम होतो व दुधाच्या उत्पादनत वाढ होते. तसेच विशिष्ट प्रथिने,जीवनसत्त्वे असलेल्या खाद्यान्नामुळे जनावरांची प्रकृती सुधारते व स्वास्थ राखले जाते. जनावरांना चाऱ्याची गरज दोन कारणासाठी असते .शारीरिक वाढीसाठी आणि उत्पादनासाठी किंवा कार्यशाक्तीसाठी. जनावरांना आपण जो चारा देतो त्या सर्वाचेच पचन होते असे नाही त्यामध्ये असणाऱ्या घटकांनुसार व प्रकारानुसार पचनयोग्य घटक वेगवेगळे असतात.

खाद्य व्यवस्थापन

जनावरांना शरीरपोषणासाठी व दुग्धोउपादनासाठी खाद्याची गरज असते. ज्या आहारातून शरीरपोषणासाठी व दुग्धोउपादनासाठी आवश्यक अन्नद्रव्ये पाचक स्वरूपात मिळतात व भूक भागते त्या आहारास‘समतोल आहार’ असे म्हणतात. सर्वसाधारणपणे १० लिटर दुध देणाऱ्या गाई/ म्हशीस(वजन अंदाजे ४०० किलो) ६-८ किलो वाळलेला चारा,२५ किलो हिरवा चारा व ५-६ किलो खुराक खाद्य आवश्यक असते. वाळलेला चारा व हिरव्या चाऱ्याची कुट्टी केल्यास २५ % खाद्याची बचत होते. सर्वसाधारण जनावरांना त्यांच्या वजनाच्या २ ते २.५ % वाळलेला चारा लागतो.वाळलेला चारा नसेल तर वजनाच्या ४ ते ६ % हिरवा चारा लागतो. म्हणजे साधरण पूर्ण वाढलेल्या जनावराला ८ ते १० किलो वाळलेला चारा व २० ते ३० किलो हिरवा चारा लागतो. दुधाळ जनावरांसाठी

फायदे

पशुखाघ वापरल्याने जनावराच्या स्वास्थ्यामध्ये जलद सुधारणा दिसून येते.
पशुखाद्यामधून योग्य व आवश्यक प्रमाणात जनावरांना शरीरासाठी व दुध उत्पादनासाठी प्रथिने देता येतात.
जनावराची रोगप्रतिकार शक्ती वाढते.
जनावराची प्रजनन क्षमता मजबूत होवून प्रजनन काळात त्याचे स्वास्थ उत्तम राखले जाते.
जनावरांपासून मिळणा-या उत्पादनाची गुणवत्ता सुधारते. उदा : दुधाचे उत्पादन वाढते,वासरे सुधृढ होतात

source : agrowon.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top