कृषी महाराष्ट्र

रेशीम शेतीला मिळणार एकरी एक लाखाचे कर्ज !

रेशीम शेतीला मिळणार एकरी एक लाखाचे कर्ज !

रेशीम शेतीला

Osmanabad News : रेशीम शेती (Silk Farming) करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकरी एक लाख रुपयांचे कर्ज (Crop Loan) देण्याबाबत बँकांनी सकारात्मकता दर्शविली आहे.

जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे (Collector Dr. Sachin Ombase) यांनी यामध्ये पुढाकार घेतला असून रेशीम शेतीला यामुळे चालना मिळणार आहे.

जिल्ह्यात रेशीम शेतीमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात प्रयोग करीत आहेत. यातून शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे.

यंदाच्या वर्षात जिल्ह्यातील १० हजार हेक्टर क्षेत्रावर रेशीम शेतीचे (Sericulture) उद्दीष्ठ ठेवले आहे. त्यासाठी जिल्ह्याचा रेशीम शेती विभाग तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाताने तत्परता दाखविली आहे. दरम्यान यासाठी लागणारे आर्थिक पाठबळ शेतकऱ्यांना बँकांकडून मिळणार आहे.

सध्या अनेक शेतकरी एका एकरात वर्षाकाठी चार ते पाच लाख रुपयांचा नफा मिळतो. शेतकऱ्यांना शेड बांधकाम करावे लागते. त्यासाठी दिड लाख रुपयांचा खर्च येतो.

मात्र अनेक शेतकऱ्यांकडे पैसे नसतात. त्यामुळे शेड बांधकाम होत नाही. परिणामी रेशीम शेतीचे स्वप्न अधुरेच राहते.

याच हेतूने एकरी एक लाख रुपयांच्या कर्जाचा प्रस्ताव बँकांकडे ठेवण्यात आला होता. काही बँकांनी यामध्ये सकारात्मकता दाखविली आहे.

जिल्ह्यात रेशीम शेतीतून शेतकरी वर्गाचा कायापालट होऊ शकतो. त्यासाठीच आम्ही जिल्ह्यात १० हजार हेक्टर क्षेत्रावर रेशीमचे उद्दीष्ठ ठेवले आहे. दरम्यान त्यासाठी लागणारी आर्थिक बाजू समजून घेतल्यानंतर बँकांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यामध्ये काही बँका तयार झाल्या आहेत. उर्वरीत बँकाही थोड्या दिवसात सकारात्मक निर्णय घेणार आहेत.
डॉ. सचिन ओम्बासे, जिल्हाधिकारी, उस्मानाबाद

source : agrowon.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top