कृषी महाराष्ट्र

ढगाळ वातावरणामुळे कांद्यावर कोणता रोग येतो ? व त्याचे नियंत्रण कसे करावे ? वाचा संपूर्ण

ढगाळ वातावरणामुळे कांद्यावर कोणता रोग येतो ? व त्याचे नियंत्रण कसे करावे ? वाचा संपूर्ण

ढगाळ वातावरणामुळे

राज्यात सध्या बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण आहे तर काही ठिकाणी पाऊसही झालाय.पावसाला पोषक हवामान व ढगाळ हवामानामुळे (Cloudy Weather) किमान तापमानात वाढ होत थंडीही गायब झालीय.त्यामुळे पहाटेच्या वेळी धुक्याच प्रमाण वाढलय.

बऱ्याच ठिकाणी कांदा पीक (Onion Crop) वेगवेगळ्या अवस्थेत आहे.सतत बदलत असलेले हवामान आणि धुक्यामुळे कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढतोय.

कांद्यावरील रोग (Onion Diseases) आणि किडीची लक्षणं आणि त्यांच नियंत्रण कस करायच ? याविषयी कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव येथील पीक शास्त्रज्ञ डॉ. दत्तात्रय गावडे यांनी दिलेली माहिती पाहुया.

कांदा पिकावरिल करपा रोगाचे जांभळा, काळा आणि तपकिरी असे तीन प्रकार आहेत.जांभळा करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास पानावर सुरवातीला लांबट पांढुरके चट्टे पडतात.

चट्ट्यांच्या मधला भाग आधी जांभळा व नंतर काळा पडतो. असे अनेक चट्टे एकमेकांत मिसळून पाने करपतात. रोपांच्या माना मऊ पडतात. ढगाळ वातावरणात या रोगाची तीव्रता वाढते.

काळा करपा रोगामध्ये सुरुवातीला पानाची बाह्य बाजू व बुडख्याजवळ राखाडी रंगाचे ठिपके आढळतात.

त्यावर बारीक गोलाकार आणि उठावदार ठिपके वाढून पाने वाळतात. कांद्यांची वाढ होत नाही. रोपांची पाने काळी पडून वाळतात.

तपकिरी करपा रोगामध्ये पिवळसर,तपकिरी रंगाचे लांबट चट्टे पानाच्या बाहेरील भागावर दिसून येतात. चट्ट्यांचा आकार वाढत जाऊन पाने सुकू लागतात.

फुलांच्या दांड्यावर हा रोग आल्यास फुलांचे दांडे मऊ होऊन, वाकून मोडून पडतात.

करपा रोगाच नियंत्रण करण्यासाठी

मॅन्कोझेब ०.३ टक्के ३ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम ०.१ टक्के १ ग्रॅम किंवा टेब्यूकोनॅझोल ०.१ टक्के

किंवा हेक्झाकोनॅझोल १ मिली किंवा मेटीराम ५५ टक्के प्रती लिटर पाण्यात मिसळून दहा ते पंधरा दिवसाच्या अंतराने आलटून पालटून फवारणी करावी.

दोन ते तीन वर्षांनी पिकांची फेरपालट करावी.

क्लोरोथेरोनॉल ०.२५ टक्के २.५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून दहा दिवसाच्या अंतराने फवारणी करावी.

फवारणीची सुरुवात कांदे लावल्यानंतर ४० ते ५० दिवसांनी करावी.

रोपे गादी वाफ्यावर तयार करावीत. वाफ्यामध्ये पाणी साचू देऊ नये.

बी पेरण्यापूर्वी बियाण्यास ५० अंश सेल्सिअस तापमान असलेल्या पाण्यात वीस मिनिटांसाठी बुडवून ठेवाव. म्हणजे हा रोग काही प्रमाणात आटोक्यात आणता येतो.

एका शिवारात सर्व शेतकऱ्यांनी फवारणी एका ठराविक काळात केली तर रोगाच नियंत्रण चांगल्या प्रकारे होऊ शकत.

पुनर्लागवड करताना रोपे कार्बेन्डाझिम ०.१ टक्के एक ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून या द्रावणात दहा ते पंधरा मिनिट बुडवून घ्यावीत व नंतर लागवड करावी.

source : agrowon.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top