कृषी महाराष्ट्र

जागतिक बाजारपेठेत कापसाच्या दरात वाढ : येणाऱ्या दिवसात कापसाची किंम्मत झळकणार ?

जागतिक बाजारपेठेत कापसाच्या दरात वाढ : येणाऱ्या दिवसात कापसाची किंम्मत झळकणार ?

कापसाच्या दरात वाढ

यावर्षी एक अंदाज होता की कापसाच्या लागवड क्षेत्रामध्ये वाढ होईल. कारण मागच्या वर्षी कापसाला जो काही उच्चांकी दर मिळाला होता, त्या अनुषंगाने कापूस लागवड क्षेत्र वाढेल आणि ते यावर्षी वाढले देखील. परंतु जुलै ते सप्टेंबर या कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे कापूस पिकाच्या अतोनात नुकसान झाले. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे जेव्हा कापूस काढणीची सुरुवात झाली तेव्हा ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने महाराष्ट्रात धुमाकूळ घालून कापूस पिकाचे प्रचंड नुकसान केले.

जेव्हा आपण मुहूर्त चे यावर्षी कापसाचे दर पाहिले तर ते 9 ते 12 हजारापर्यंत देखील मिळाले. परंतु आता जर कापूस बाजार भावाचा विचार केला तर सध्या सात हजार ते आठ हजार पाचशे रुपयांपर्यंत दर मिळताना दिसून येत आहे.

जर सध्याच्या कापूस मार्केटचा विचार केला तर बाजार भाव हे थोडे नरमलेलेच आहेत. परंतु जर आपण सध्याच्या जागतिक बाजारपेठेचा विचार केला तर कापसाच्या भावात सुधारणा होताना दिसून येत आहे म्हणजेच आंतरराष्ट्रीय कापूस बाजार साडेपाच टक्क्यांनी सुधारला आहे.

काय आहे सध्याच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थिती ?

जर सध्याचा कापसाचा बाजार भावाचा विचार केला तर मोठी सुधारणा यामध्ये दिसून येत असून आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर वाढल्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत देखील कापसात थोडीशी वाढ दिसून आली आहे.

तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार जागतिक बाजारात कापसाचे बाजार भाव सुधारले असल्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत कापसाचे प्रतिक्विंटल 100 ते 200 रुपयांची वाढ यामध्ये दिसून आली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात निश्चितच कापसाच्या दरात वाढवण्याची एक शक्यता आहे.

जर आपण दोन दिवसाचा विचार केला तर काही देशांतर्गत लिलावांमध्ये कापसाला 7000 ते 8800 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला. महाराष्ट्रात देखील कापसाच्या दरात वाढ झाली असून आंतरराष्ट्रीय बाजारात दर वाढ झाल्यामुळे ही किंचितशी दरवाढ महाराष्ट्रात देखील नमूद करण्यात आली आहे.

महाराष्ट्राच्या बाजारपेठेचा विचार केला तर कापूस 7100 ते 8500 प्रतिक्विंटल पर्यंत आहे. या क्षेत्रातील जाणकार लोकांचा मताचा विचार केला तर त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात भविष्यामध्ये कापसाला मागणी वाढेल व कापसाच्या बाजारपेठेत अजून वाढवण्याची शक्यता त्यामुळे निर्माण होऊ शकते.

जाणकारांच्या मते फेब्रुवारी महिन्यापर्यंत कापसाला उत्तम बाजार भाव मिळण्याची शक्यता असून फेब्रुवारी महिन्यात 9 हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा बाजार भाव कापसाला मिळू शकतो. त्यामुळे शेतकरी बंधूंनी कापसाची विक्री करताना बाजारपेठेचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्याने करणे गरजेचे असून ते शेतकऱ्यांसाठी फायद्याचे राहणार आहे.

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top