कृषी महाराष्ट्र

NAMO Shetkari Scheme : ‘नमो महासन्मान’ योजनेचा हप्ता दसऱ्यापूर्वी मिळणार ! वाचा सविस्तर

NAMO Shetkari Scheme : ‘नमो महासन्मान’ योजनेचा हप्ता दसऱ्यापूर्वी मिळणार ! वाचा सविस्तर

 

NAMO Shetkari Scheme : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या (पीएम किसान) धर्तीवर राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेत जिल्ह्यातील जवळपास साडेतीन लाख शेतकरी पात्र ठरणार आहेत. या शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळणार असून, पहिला हप्ता दसऱ्यापूर्वी जमा होण्याची शक्यता आहे.

अल्प व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना शेतीचा विकास करण्यासाठी आर्थिक साह्य करण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली आहे. याच धर्तीवर आता राज्य शासनानेही महासन्मान योजनेची घोषणा केली होती. पीएम किसान योजनेत जिल्ह्यात साडेतीन लाख शेतकरी लाभार्थ्यांनी नोंदणी केली आहे. NAMO Shetkari Scheme

या योजनेतील पात्र शेतकरी कुटुंबियांना दोन हजार प्रतिहप्ताप्रमाणे तीन हप्त्यांत सहा हजार प्रतिवर्ष मिळणार आहेत. यानंतर आता राज्य शासनही सहा हजार रुपये शेतकऱ्यांना देणार आहे. राज्य शासनाच्या पहिल्या हप्त्याचे वितरण दसऱ्यापूर्वी होण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने तयारी सुरू आहे. Namo Scheme

जिल्ह्यात तीन लाख शेतकऱ्यांना ही मदत सुरुवातीला मिळाली होती, नंतर केंद्र सरकारने आयकर भरणारे शेतकरी व शेती नावावर असलेले नोकरदार यांना यातून वगळले. त्यामुळे ही संख्या काहीशी कमी झाली. पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या लाभार्थींना आधार, कार्ड बँक खात्याशी लिंक करणे व आधार तसेच बँक खाते यापूर्वीच लिंक असेल तर त्याची ई-केवायसी प्रक्रिया करून घेण्याचे निर्देश देण्यात आले होते.

माहिती अद्ययावत करा !

पीएम किसान सन्मान योजनेसाठी सर्व नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण करणे बंधनकारक होते. आता राज्य शासनही रक्कम देणार असल्याने लाभार्थ्यांना योजनेचा लाभ अखंडितपणे मिळविण्यासाठी आपले आधार कार्ड, बँक खाते पुस्तिकेची सुस्पष्ट प्रत व जमिनीच्या कागदपत्रांसह (७/१२ उतारा आदी) तयार ठेवावा लागणार आहे.

NAMO Shetkari Scheme, Namo Scheme

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top