कृषी महाराष्ट्र

खरीपातील कीड, रोग उन्हाळ्यातील मशागतीने टाळता येतील ! वाचा संपूर्ण

खरीपातील कीड, रोग उन्हाळ्यातील मशागतीने टाळता येतील ! वाचा संपूर्ण

खरीपातील कीड

खरीप व रब्बी हंगामामध्ये (Kharif, Rabbi Season) येणाऱ्या विविध किडींच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकांचा (Pesicide Use) वापर होत असतो. गेल्या काही वर्षात रासायनिक कीटकनाशकांचा होणारा अतिरेकी वापर हा किडींचा प्रादुर्भाव वाढण्यास कारणीभूत ठरतोय.

किडींमध्ये किटकनाशकांबाबत निर्माण झालेली प्रतिकारशक्ती, दुय्यम किडींचा होणारा उद्रेक, मित्र किटकांचे कमी होत चाललेली संख्या अशा परिस्थितीत वेळोवेळी शेतात निरीक्षण करून एकात्मिक किड नियंत्रणाचे विविध उपाय योजले तर अनावश्यक फवारणी व त्यावरील खर्चात बचत होईल.

एकात्मिक कीड नियंत्रणाच्या (IPM) दृष्टीने पूर्व हंगामी किड नियंत्रण करणे ही कीड नियंत्रणाची प्रभावी पद्धत आहे. पूर्व हंगामी किड नियंत्रण (Pre-seasonal Pest Control) म्हणजे काय तर हंगामाच्या सुरुवातीलाच विविध मशागतीय पद्धतीचा अवलंब करुन पिकातील किडींना आटकाव करणे.

एकात्मिक व्यवस्थापनाच्या मशागतीय पद्धतीचा अवलंब केल्यास कीड नियंत्रण करण्यास मदत होते. या मशागतीय पद्धतीविषयी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहुया.

शेतात पिकाची फेरपालट ही जुनी व पारंपारिक पद्धत आहे. त्यामुळे किडींना यजमान वनस्पती न मिळाल्यामुळे किडींचे नैसर्गिकरित्या नियंत्रण मिळविण्यास मदत होते.

पिकाचा हंगाम संपल्याबरोबर पिकाचे अवशेष, पऱ्हाट्या, तुराट्या यांचा पावसाळ्यापूर्वी वापर करून नष्ट कराव्यात किंवा कंपोस्ट साठी वापर करावा. अन्यथा त्यावर किडींच्या विविध अवस्था येऊन पोषक वातावरणात त्यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता राहते.

शेताची तीन वर्षातून एकदा खोल नांगरणी करावी. म्हणजे जमिनीत असलेल्या किडींच्या अवस्था जमिनीवर येऊन उन्हामुळे किंवा भक्षक पक्षांद्वारे नष्ट होतील.

पहिल्या पावसानंतर शेताच्या बांधावर असलेले तण नष्ट करावे. जेणेकरून किडीची पहिली पिढी तणांवर तयार होऊ शकणार नाही.

घरचे बियाणे वापरायचे झाल्यास बियाण्यास चाळणी लावून किडके, अशक्त बियाणे वेगळे करून त्याची उगवण शक्ती तपासावी व त्यानुसार एकरी बियाणे वापरण्याचे प्रमाण ठरवावे.

उपलब्धतेनुसार कीड प्रतिकारक वाणाचा वापर करावा. बियाण्याची पेरणी करताना शिफारस केलेल्या अंतरानुसार पिकाची लागवड करावी. कारण पावसात खंड पडल्यास किडींच्या आक्रमणामुळे पिकाची हेक्टरी संख्या कमी होण्याची शक्यता असते. Crop Protection Practices

कपाशी व इतर पिके हंगामा बाहेर घेणे टाळावे. त्यामुळे किडींचा जीवनक्रम खंडित होतो.

चांगल्या कुजलेल्या शेण खताचा वापर करावा. माती परीक्षण करूनच खताचा त्याप्रमाणे वापर करावा. नत्र खताचा अतिवापर टाळावा.

हंगामात वेळोवेळी आंतरमशागत करावी त्यामुळे किडीला पुरक अशा तणाचा नाश होतो. खरीपातील कीड खरीपातील कीड

source:agrowon

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top