कृषी महाराष्ट्र

शेतात कोंबडी खताचा वापर कसा करायचा ? वाचा सविस्तर

शेतात कोंबडी खताचा वापर कसा करायचा ? वाचा सविस्तर

कोंबडी खताचा वापर

सध्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे (Organic Carbon) प्रमाण कमी होत चालले आहे. त्यामुळे सेंद्रिय खतांचा वापर वाढविणे आवश्यक आहे.

बऱ्याच प्रकारची सेंद्रिय खते उपलब्ध आहेत. त्यामध्ये कोंबडी खत (Poultry Manure) हा उत्तम पर्याय आहे. कोंबडी खत वापरल्याने मातीची भौतिक, रासायनिक व जैविक क्षमता सुधारते.

कोंबडी खताचे गुणधर्म आणि कोंबडी खताचा वापर कसा करायचा? याविषयी मृद्‌शास्त्र व कृषी रसायनशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहुया.

कोंबडी खताचा शेतीत वापर करताना…

मशागतीच्या वेळी पेरणीपूर्वी एक ते दीड महिना अगोदर कोंबडीखत जमिनीत मिसळावे. यानंतर कुळवाची पाळी द्यावी; मात्र ताजे कोंबडीखत उभ्या पिकांत जमिनीत मिसळू नये.

उभ्या पिकांत कोंबडीखत जमिनीत मिसळण्यापूर्वी प्रथम त्यावर एक महिना पाणी मारून रापून किंवा थंड होऊ द्यावे म्हणजे कोंबडीखताचे कर्ब : नत्र गुणोत्तर कमी होऊन त्यातील अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध होतात.

कोंबड्यांच्या शेडमध्ये कोंबड्यांची विष्ठा, मूत्र, गव्हांडा किंवा भाताच्या तुसावर पडून खत तयार होते, त्यामुळे ताज्या कोंबडीखताचे कर्ब : नत्र गुणोत्तर जास्त असते. असे खत उभ्या पिकांत जमिनीत मिसळताना ओलावा असला पाहिजे.

जमिनीत पुरेसा ओलावा नसेल तर पीक पिवळे पडते, त्यामुळे ताजे कोंबडीखत थेट पिकांसाठी वापरू नये. उभ्या पिकांत पूर्ण कुजलेले कोंबडीखत वापरावे.

हलक्‍या, जास्त निचऱ्याच्या, लालसर तांबड्या जमिनीत कोंबडीखतातील नत्र, स्फुरद, पालाश अन्नद्रव्यांव्यतिरिक्त कॅल्शिअम, मॅग्नेशिअम व सोडिअमचे प्रमाण जमिनीत मिसळले जाऊन पिकांना उपलब्ध होतात. जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. शेणखतासारखा तणांचा प्रादुर्भाव कोंबडीखतातून होत नाही. Poultry Manuers

कोंबडी खत कसे असावे ?

खताचा रंग भुरकट, तपकिरी, काळपट असावा. वास मातकट असावा

खताचा सामू ६.५- ७.५ दरम्यान असावा.

कणांचा आकार ५ ते १० मिमी असावा.

कर्ब नत्र गुणोत्तर १:१० ते १:२० दरम्यान असावे.

जलधारणाशक्ती ३० टक्क्यांपेक्षा जास्त असावी. कोंबडी खताचा वापर कोंबडी खताचा वापर कोंबडी खताचा वापर

source:agrowon

FAQ : Use of chicken manure

[sc_fs_multi_faq headline-0=”h2″ question-0=”तुम्ही कोंबडीचे खत सरळ बागेत टाकू शकता का?” answer-0=”माती दुरुस्ती किंवा खत म्हणून वापरणे . तथापि, कच्चे कोंबडीचे खत झाडांना जाळू शकते आणि नुकसान करू शकते. ते कंपोस्ट केलेले किंवा वापरण्यापूर्वी जुने असावे. याव्यतिरिक्त, कच्च्या खतामध्ये रोगजनक असू शकतात जे लोक आणि प्राण्यांना हानी पोहोचवू शकतात.” image-0=”” headline-1=”h2″ question-1=”कोंबडी खत एकरी किती टाकावे?” answer-1=”ताजे कोंबडी खत लगेच पिकांना वापरू नये. जमीन व पीक लागवडीनुसार प्रति एकरी ५ ते २० टन खताचा वापर करावा.” image-1=”” headline-2=”h2″ question-2=”कोंबडीचे खत कुजण्यास किती वेळ लागतो?” answer-2=”साहित्य अर्धा इंच किंवा त्याहून लहान असल्यास विघटन प्रक्रियेस सहा महिने लागतात. यावेळी, तुम्ही तुमच्या लॉन आणि बागेसाठी नैसर्गिक खत म्हणून कंपोस्ट वापरण्यास तयार आहात! लागवडीच्या २-३ आठवडे अगोदर बागेच्या मातीत कंपोस्ट केलेले साहित्य पूर्णपणे मिसळा.” image-2=”” headline-3=”h2″ question-3=”चिकन खत कशासाठी चांगले आहे?” answer-3=”पोल्ट्री खत का वापरावे? पोल्ट्री खत उत्पादने बाजारात सर्वात सामान्यपणे उपलब्ध नसलेल्या रासायनिक खतांपैकी एक आहेत. कोंबडी खत नायट्रोजनचा एक उपयुक्त स्त्रोत आहे, मुख्य पोषक द्रव्ये ज्याची झाडांना हिरव्या पानांच्या वाढीसाठी आवश्यकता असते . त्यात इतर महत्त्वाच्या पोषक घटकांचाही कमी प्रमाणात समावेश होतो.” image-3=”” count=”4″ html=”true” css_class=””]

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top