कृषी महाराष्ट्र

घरबसल्या पशुपालकांना समजणार जनावरांचं लोकेशन ! वाचा संपूर्ण माहिती

घरबसल्या पशुपालकांना समजणार जनावरांचं लोकेशन ! वाचा संपूर्ण माहिती

घरबसल्या पशुपालकांना

Agriculture Technology दिवसेंदिवस तंत्रज्ञानाचा झपाट्याने प्रसार होत आहे. आजच्या आधुनिक काळात तंत्रज्ञानाशिवाय काम करणे शक्यच नाही. स्मार्टफोनच्या अविष्कारानंतर तर जग जणू काय हातातच आलं आहे. शहरापुरती मर्यादित असणारी तंत्रज्ञानाची गंगा आता खेड्यापाड्यातूनही वाहायला लागली आहे.

आजकाल अशी काही आधुनिक उपकरणांची निर्मीती होत आहे, की ज्यामुळे काही तासाचे काम अगदी कमी वेळात करता येणे शक्य झाले आहे. अशाच काही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये होताना दिसत आहे. त्यामुळे शेती काही प्रमाणात सोपी अन् फायद्याची झाली आहे. Animal Care

शेतीला पूरक अशा पशुपालन व्यवसायातही आता तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर होताना दिसत आहे. अशाचा एका नव्या तंत्रज्ञानाची निर्मीती शास्त्रज्ञांनी केली असून जनावरांची लोकेशन दाखविणारे हे तंत्रज्ञान आहे.

‘काऊ मॉनिटर सिस्टिम’ (Cow Monitor System) असं याचं नाव आहे. इंडियन डेअरी मशिनरी कंपनीने (IDMC) हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. ही कंपनी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या अखत्यारित आहे.

काय आहे काऊ मॉनिटर सिस्टिम

हे एक पट्ट्यासारखे उपकरण असून याला जनावरांच्या गळ्यात बांधले जाते. यामध्ये जीपीएस यंत्रणा कार्यान्वित असून पशुपालकाला आपले जनावर सध्या कोठे आहे याची माहिती मिळते.

चरत चरत दूरवर जाणाऱ्या जनावरांना शोधण्यासाठी तर याचा फायदा होणारच आहे. पण चोरीला गेलेले जनावरही याच्या मदतीने शोधता येणार आहे. याशिवाय जनावरांच्या शारिरीक हालचालीतून भविष्यात उद्भवणाऱ्या आजारांचीही माहिती मिळणार आहे.

त्यामुळे पशुपालकाला रोगप्रतिबंधात्मक उपाय करता येतील. तसेच जनावर गाभण असल्याची माहितीही पशुपालकाला या उपकरणामुळे समजणार आहे. Animal Care

हे उपकरण कसे वापरायचे

काउ मॉनिटरींग सिस्टीम हे उपकण पट्ट्याप्रमाणे असून याला जनावराच्या गळ्यात बांधता येते. बऱ्याचदा चरताना जनावर दूर निघून जाते अशावेळी जनावराला शोधण्यासाठी हे उपकरण उपयुक्त ठरणार आहे. जनावराच्या गळ्याती या पट्ट्याला जोडलेल्या उपकरणाने ट्रॅक करता येते. या तंत्राच्या सहाय्याने १० किमी पर्यंतच्या परिसरातील जनावरांची लोकेशन ट्रॅक केले जाऊ शकते.

हे उपकरण बॅटरीवर चालणारे आहे. याची बॅटरी लाईफ ३ ते ५ वर्षांची असून याची किंमत चार हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत सांगितली जाते. येत्या तीन ते चार महिन्यात हे उपकरण पशुपालकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

source : agrowon.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top