युनियन बँकेकडून १५० कृषि ड्रोनसाठी मिळणार कर्ज ! वाचा संपूर्ण माहिती
युनियन बँकेकडून
देशात राबवण्यात येणाऱ्या किसान पुष्पक योजने (Kisan Pushapak Scheme)अंतर्गत १५० ड्रोनसाठी युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India) कर्ज देणार आहे. ‘गरुड एरोस्पेस’ (Garud AeroSpace) या स्टार्टअप कंपनीने युनियन बँक ऑफ इंडियाशी यासंदर्भात करार केला आहे.
या करारामध्ये किसान पुष्पक योजनेनुसार १५० गरुड कृषी किसान ड्रोनसाठी मंजूरी दिली आहे. बँकेमार्फत शेतकऱ्यांना ड्रोनसाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
ड्रोनमुळे पिकांवर खते आणि किडनाशके फवारणी करता येते. तसेच जमिनीचे सर्व प्रकारचे सर्व्हेक्षण ड्रोनच्या मदतीने केले जाते.
जुलै २०२२ मध्ये केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून गरुड किसान ड्रोनसाठी कर्ज पुरवठा करण्यात आला होता. तसेच ‘ॲग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड’च्या (एआयएफ) माध्यमातून १ हजार कोटी रुपये ड्रोनसाठी देण्यात आले.
‘एआयएफ’च्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या ड्रोन कर्जावर ३ महिन्याची हप्त्यावर सूट देण्यात आली आहे. तसेच तरुण शेतकऱ्यांसाठी ५ टक्के व्याजदरावर १० लाखांपर्यंत कर्ज देण्यात येणार आहे.
गरुड एरोस्पेसचे संस्थापक आणि कार्यकारी अधिकारी अग्निश्वर जयप्रकाश म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ मध्ये गरुड किसान ड्रोन यात्रेला हिरवा कंदील दाखवला आहे. देशभरातील १०० गावांमध्ये १०० कृषी ड्रोन उडवण्यात आले.
पुढील ६ महिन्यामध्ये १०० देशांमध्ये १० हजार ड्रोनची निर्यात करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. तसेच युनियन बँक ऑफ इंडियाशी केलेल्या करारामुळे १५० ड्रोनचा शेतकऱ्यांना फायदा होईल.
तसेच १ लाख तरूणांना ड्रोनचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आणि ३१ मार्च २०२३ पर्यंत ५ हजार ड्रोन विक्रीचे नियोजन करण्यात आले आहे.”
शेती व्यवसयात ड्रोनचा वापर वाढवण्यासाठी केंद्र सरकारचा प्रयत्न राहिलेला आहे. यासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून सरकारने यावर लक्ष केंद्रीत केली आहे. यामधून शेती व्यवसाय सुलभ व्हावा हीच भावना केंद्राची राहणार आहे.
त्याच अनुशंगाने जागोजागी ड्रोनची प्रात्याक्षिके करुन दाखवली जात आहेत. मागील दोन कृषी संस्थांकडून शेतकऱ्यांमधील रेखांकनाच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी शेतात ड्रोन चाचण्या देखील घेण्यात आल्या आहेत. मात्र, यादरम्यान शेतकऱ्यांनी एक ना अनेक समस्या उपस्थित केल्या आहेत.
Source : agrowon.c0m