कृषी महाराष्ट्र

Maharashtra Rain Forecast : राज्यात आज वादळी पावसाची शक्यता ! हवामान खात्याचा अंदाज

Maharashtra Rain Forecast : राज्यात आज वादळी पावसाची शक्यता ! हवामान खात्याचा अंदाज

Maharashtra Rain Forecast

Weather Update Pune : राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान झाल्याने उन्हाचा चटका कमी होत आहे. आज (ता. ५) दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज आहे.

पावसाला पोषक हवामान, पावसाची हजेरी यामुळे राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरूच आहेत. रविवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर अमरावती, ब्रह्मपूरी, अकोला आणि वर्धा येथे तापमान ४३ अंशांच्या पुढे होते. उर्वरित राज्यात अनेक ठिकाणी तापमान ३५ ते ४३ अंशांच्या दरम्यान होते.

अरबी समुद्राच्या आग्नेय भागात आज (ता. ५) चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. या चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे बुधवारपर्यंत (ता. ७) या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. दरम्यान पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात म्यानमार किनाऱ्याजवळ समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे.

दक्षिण छत्तीसगड आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. या प्रणाली पासून तामिळनाडूपर्यंत दक्षिणोत्तर हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. राज्यात पूर्व मोसमी पावसाला पोषक हवामान होत असून, आज (ता. ५) राज्यात उष्ण व दमट हवामान हवामान राहण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, आणि मराठवाड्यात विजा, मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

रविवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३७.१ (२४.४), जळगाव ४१.९ (२७.९), धुळे ४१.० (१८.०), कोल्हापूर ३६.६ (२४.७), महाबळेश्वर ३०.३ (१८.८), नाशिक ३५.८ (२४.८),

निफाड ४०.२ (२६.५), सांगली ३८.२ (२४.२), सातारा ३८.८ (२३.४), सोलापूर ४१.२ (२६.५), सांताक्रूझ ३४.५ (२९.५), डहाणू ३५.२ (२९.७), रत्नागिरी ३५.५ (२८.४),

छत्रपती संभाजीनगर ३८.७ (२४.६), नांदेड ४०.४ (२७.०), परभणी ४१.५ (२७.५), अकोला ४३.० (२९.४), अमरावती ४३.४(२५.२), बुलढाणा ३९.८ (२७.०), ब्रह्मपूरी ४३.२ (२६.९),

चंद्रपूर ४४.०(२७.६), गोंदिया ४२.६ (२६.०), नागपूर ४१.३ (२४.०), वर्धा ४३.०(२५.८), वाशीम ४२.४(२६.४) यवतमाळ ४१.५ (२४.०).

मॉन्सूनचे आगमन लांबणार

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) अरबी समुद्रातील प्रगती करत शुक्रवारी (ता. २) लक्षद्वीप बेटांचा काही भाग, दक्षिण श्रीलंका, संपूर्ण कोमोरीन भाग आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात प्रगती केली.

त्यानंतर मॉन्सूनची चाल मंदावली असून, केरळातील मॉन्सूनचे आगमन लांबले आहे. मॉन्सून यंदा ४ जून रोजी केरळात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती. यात मोसमी वाऱ्यांचे आगमन चार दिवस उशीराने होण्याची शक्यता गृहित धरण्यात आली आहे.

कोकण : रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

मध्य महाराष्ट्र : पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.

मराठवाडा : धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड.

source : agrowon

Monsoon Season, Rain Update, Weather Update

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top