कृषी महाराष्ट्र

Monsoon Update | मॉन्सून यंदा उशिरा दाखल होणार ! ‘स्कायमेट’ चा अंदाज

Monsoon Update | मॉन्सून यंदा उशिरा दाखल होणार ! ‘स्कायमेट’ चा अंदाज

Monsoon Update

Monsoon : यंदा मॉन्सूनची गती संथ राहील. त्यामुळे मॉन्सून उशिरा दाखल होण्याचा अंदाज स्कायमेट वेदर या खाजगी हवामान संस्थेने वर्तवला आहे. दरवर्षी २२ मे रोजी मॉन्सून दाखल असतो. परंतु यंदा मॉन्सूनची गती संथ दिसत आहे.

त्यामुळे यंदा मॉन्सून अंदमानमध्ये उशिरा दाखल होईल, असं स्कायमेटने म्हंटलं आहे. तळकोकणात ७ जून रोजी तर मुंबईमध्ये ११ जून रोजी मॉन्सून दाखल होईल, असा अंदाजही स्कायमेटने वर्तवला आहे.

दरवर्षी केरळात १ जून रोजी नैऋत्य मॉन्सून दाखल होत असतो. परंतु यंदा त्याबद्दल निश्चित सांगणं कठीण आहे, असं स्कायमेटनं म्हंटलं आहे. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवसांत भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मॉन्सूनच्या आगमनाबद्दलची तपशील जाहीर करण्यात येतील. (Monsoon Update Skymate 2023)

स्कायमेट ही हवामान अंदाज वर्तवणारी संस्था आहे. हवामानबद्दल अंदाज देण्याचं काम ही संस्था करते. मॉन्सूनच्या दाखल होण्याबद्दल स्कायमेट आणि भारतीय हवामान शास्त्र विभागात गेल्यावर्षी खटके उडाले होते.

यंदा मॉन्सूनवर एल निनोचा प्रभाव राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु त्याबद्दलचं चित्र अजून तरी पूर्णत: स्पष्ट नाही. यंदा दीर्घकालिन सरासरीच्या ९४ टक्के पाऊस होईल, तसेच महाराष्ट्रात जुलै आणि ऑगस्टमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहील, असे स्कायमेटने म्हटले होते. Monsoon

तर देशात मॉन्सून सर्वसाधारण (नॉर्मल) राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने जाहीर केला. यंदा सरासरीच्या तुलनेत ९६ टक्के पाऊस पडेल, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे.

source : agrowon

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top