कृषी महाराष्ट्र

आता मिळणार अर्ध्या किंमतीत नॅनो डीएपी खत ! वाचा संपूर्ण

आता मिळणार अर्ध्या किंमतीत नॅनो डीएपी खत ! वाचा संपूर्ण

नॅनो डीएपी खत

Nano DAP | शेतातील पिकांची वाढ जोमाने व्हावी यासाठी शेतकरी शेतामध्ये विविध खतांचा वापर करतात. यामध्ये युरिया आणि डीएपी खत प्रामुख्याने वापरले जाते. आतापर्यंत शेतकरी स्थायु स्वरूपातील डीएपी खत (DAP) शेतात वापरत होते. मात्र देशात सध्या द्रव्य स्वरूपातील नॅनो डीएपी खताची (Nano DAP) चर्चा सुरू आहे. देशात पहिल्यांदाच हे खत शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होणार आहे.

द्रव्य स्वरूपातील नॅनो डीएपी खत

यावर्षीच्या हंगामात शेतकरी द्रव्य स्वरूपातील नॅनो डीएपी खत वापरू शकणार आहेत. पिकांच्या भरघोस वाढीसाठी नत्र, स्फुरद व पालाश यांची गरज असते. डीएपीमध्ये हे तिन्ही घटक उपलब्ध असतात. यामुळे डीएपीच्या वापराने पिकांची जोमाने वाढ होते. म्हणून शेतकरी दर वर्षी मोठ्या प्रमाणात डीएपी खताची मागणी करतात.

खताच्या एका बॅगसाठी मोजावे लागत होते १३५० रुपये

मात्र दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. याचा फटका शेतकऱ्यांना सुद्धा बसत असून या खतांच्या किंमती वाढत आहेत. वाढत्या खतांच्या किंमतीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट पूर्णपणे कोलमडते. परंतु, आता डीएपी खत शेतकऱ्यांना कमी किंमतीत मिळणार आहे. डीएपी खताच्या एका बॅगसाठी शेतकऱ्यांना आतापर्यंत १३५० रुपये मोजावे लागत होते.

अर्ध्या किंमतीत मिळणार डीएपी खत

यावर्षी पासून शेतकऱ्यांसाठी नॅनो डीएपी खत बाटलीमध्ये द्रव्य स्वरूपात उपलब्ध होणार आहे. ही बॉटल ६०० रुपयांना मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना निव्वळ अर्ध्या किंमतीत डीएपी खत मिळणार आहे. देशभरातील शेतकऱ्यांना नॅनो डीएपी खत मिळावे यासाठी तब्बल ५ कोटी बॉटल्सची निर्मिती होणार आहे.

नॅनो डीएपी खताने होणार ‘हे’ फायदे

द्रव्य स्वरूपातील नॅनो डीएपी फवारणीमधून पिकांना देता येतो. यामुळे खत व्यवस्थितरित्या पिकापर्यंत पोहोचते आणि पिकाची गुणवत्ता, पौष्टिकता आणि उत्पादकता वाढते. महत्त्वाची बाब म्हणजे नॅनो डीएपी खताच्या फवारणीसाठी सरकार शेतकऱ्यांना ड्रोन (Drone) उपलब्ध करून देणार आहे. तसेच ड्रोन चालवण्यासाठी प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे.

source : mieshetkari

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top