उन्हाळी कांद्याला टक्कर देण्यासाठी लाल कांद्याच नवं ‘वाण’ विकसित : वाचा संपूर्ण
उन्हाळी कांद्याला
नाशिक : गेल्या काही वर्षांपासून कांद्याची स्थिती काही फारशी चांगली नाहीये. उत्पादन खर्चही निघत नाही अशी स्थिति काही ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यात जर लाल कांदा असेल तर तो लागलीच विकावा लागतो. त्याची साठवण क्षमताही काही जास्त दिवस नसते. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मेटकुटीला आला होता. एकूणच काय कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा अक्षरशः वांदा झालेला असतांना एक आनंदाची आणि दिलासादायक बाब समोर आली आहे. उन्हाळ कांद्याच्या प्रमाणे टिकवण क्षमता आणि दिसायला लाल कांद्यासारखं नवं कांद्याचे वाण बाजारात दाखल होणार आहे.
लाल रंग असलेल्या कांद्याला बाजारात चांगली मागणी असते. त्या धरतीवर राष्ट्रीय बागवानी अनुसंशोधन केंद्राकडून उन्हाळ कांद्याप्रमाणेच टिकवण क्षमता असलेले लाल कांद्यामध्ये नवीन वाण विकसित करण्यात आले आहे.
हेक्टरी 380 ते 400 क्विंटल पर्यंत उत्पादन देणारे हे वाण आहे. एन एच आर डी एफ फुरसुंगी असे या लाल कांद्याच्या वाणाला नाव देण्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठी लवकरच हे बियाणे उपलब्ध केले जाणार आहे.
हे वाण 110 ते 120 दिवसात काढणीला येते. उन्हाळ कांद्याप्रमाणे पाच ते सात महिने टिकवण क्षमता असलेले हे नवीन वाण आहे. वजन देखील चांगले असल्याने हेक्टरी 380 ते 400 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
करपा आणि मावा रोगाचा प्रादुर्भाव या नवीन कांद्याच्या पिकावर कमी प्रमाणात होतो. शिवाय हा कांदा साठवणूक केल्यानंतर काळपट पडण्याचे प्रमाणही कमी आहे. त्यामुळे लाल कलर असल्याने बाजारात देखील मागणी अधिक असेल असा अंदाज वर्तविला जात आहे.
एन एच आर डी एफ फुरसुंगी या वाणाचे शेतकऱ्यांसाठी 15 ऑगस्ट पासून बियाणे उपलब्ध होणार आहे. यामध्ये या नवीन वाणाचे बियाणे नाशिक जिल्ह्यातील चितेगांव, लासलगाव आणि सिन्नर येथील केंद्रांवर मिळणार आहे.
कांद्यावर नेहमीच वेगवेगळे संशोधन करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील चितेगाव येथील राष्ट्रीय बागवानी अनुसंशोधन केंद्र (N H R D F ) च्या वतीने रब्बीसाठी लाल कांद्यामध्ये संशोधन करत नवीन वाण विकसित केले आहे.
लाल कलर असल्याने बाजार मागणी देणार असल्याने शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. राष्ट्रीय बागवानी अनुसंशोधन केंद्राचे प्लांट पॅथॉलॉजी टेक्निकल अधिकारी मनोज पांडे यांनी याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान या वाणाच्या किंमतीबद्दल स्पष्टता विक्रीच्याव वेळेसच होणार आहे. उन्हाळी कांद्याला उन्हाळी कांद्याला उन्हाळी कांद्याला उन्हाळी कांद्याला
source : tv9marathi
FAQ : कांद्या विषयी काही प्रश्न व त्यांची उत्तरे
[sc_fs_multi_faq headline-0=”h2″ question-0=”उन्हाळी कांदा लागवड कधी करावी?” answer-0=”महाराष्ट्रात कांद्याची लागवड खरीप हंगामात जून ते ऑक्टोबर, रब्बी हंगामात नोव्हेंबर ते फेब्रूवारी आणि उन्हाळी हंगामात जानेवारी ते जून महिन्यात करतात.” image-0=”” headline-1=”h2″ question-1=”उन्हाळ्यात कांदा वाढू शकतो का?” answer-1=”तापमानानुसार कांदे (अॅलियम सेपा) ही एक कठोर वनस्पती आहे जी वर्षाच्या जवळजवळ कोणत्याही वेळी वाढू शकते . बहुतेक लोक त्यांना उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या कापणीसाठी वसंत ऋतूच्या सुरुवातीस लावतात किंवा उन्हाळ्याच्या उत्तरार्धात किंवा शरद ऋतूच्या सुरुवातीच्या काळात जास्त हिवाळ्यातील कापणीसाठी अनेक पेरणी करतात.” image-1=”” headline-2=”h2″ question-2=”कांदा बी किती दिवसात उगवते?” answer-2=”लागवडीपासून 120 दिवसात तयार होतोत. हेक्टरी उत्पादन 250 ते 300 क्विंटल मिळते. हेक्टरी कांद्याचे 10 किलो बियाणे पुरेसे असते.” image-2=”” headline-3=”h2″ question-3=”कांदा फुगवण्यासाठी काय वापरावे?” answer-3=”1250 ग्रॅम किंवा डायिन झेड 78, 75 डब्ल्यू.डी. पी. 1000 ग्रॅम 500 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. कांद्याची काढणी व उत्पादन लागवडीनंतर ३ ते ४.५ महिन्यात कांदा काढणीस तयार होते.” image-3=”” count=”4″ html=”true” css_class=””]
new variety of red onion developed