कृषी महाराष्ट्र

PM Kisan : पीएम किसानचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा ! लाभार्थ्यांची आकडेवारी समोर

PM Kisan : पीएम किसानचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा ! लाभार्थ्यांची आकडेवारी समोर

 

PM Kisan News : केंद्र सरकारकडून वर्षाला ६ रूपये प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात तीन टप्प्यात रक्कम जमा केली जाते. दरम्यान यावर्षीचा दुसरा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे. देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांना एकाच वेळी पैसे जमा होणार आहेत.

दरम्यान महाराष्ट्रातील ८५ लाख ६६ हजार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत त्या शेतकऱ्यांनी जवळच्या महा ई सेवा केंद्रात जाऊन आपली केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले.

महाराष्ट्रातील ८५.६६ लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात १८६६.४० कोटी रुपयांचा निधी पीएम किसान योजनेअंतर्गत हस्तांतरीत केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (ता.२७) हा निधी जमा केला जाणार आहे. शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवून देण्यासाठी, केंद्र सरकारने पीएम किसान योजना मागच्या ५ वर्षांपासून राबवली जाते.

या योजनेंतर्गत सर्व पात्र शेतकऱ्यांना २ हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये वर्षाकाठी ६ हजार रुपयांचा निधी दिला जातो. फेब्रुवारी २०१९ मध्ये योजना सुरू झाल्यापासून ११०.५३ लाख लाभार्थी शेतकऱ्यांना २३७३१.८१ कोटींचा लाभ हस्तांतरीत करण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली. PM Kisan

प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी त्या-त्या कृषिविभाग अंतर्गत येणाऱ्या आस्थापनामध्ये अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व शेतकऱ्यांनी या समारंभामध्ये http://pmindiawebcastnic.in या लिंक व्दारे सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. PM Kisan Scheme

पीएम किसान सन्मान निधी योजनेतील फसवणूक रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून कठोर कारवाई करण्यात आली आहे. यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या कमी झाली आहे. एप्रिल ते जुलै २०२२-२३ चा हप्ता ११.२७ कोटी शेतकऱ्यांना मिळाला होता. परंतु, ऑगस्ट-नोव्हेंबर २०२२-२३ मध्ये केवळ ८ कोटी शेतकऱ्यांना हप्ता मिळाला. डिसेंबर-मार्च २०२२-२३ मध्ये ही संख्या ८.८० कोटी इतकी होती.

source : agrowon

PM Kisan, PM Kisan 14th Installment

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top