कृषी महाराष्ट्र

Turmeric Rate : ऐन सणासुदीत हळदीच्या बाजारावर दबाव ! भाव काय राहतील ?

Turmeric Rate : ऐन सणासुदीत हळदीच्या बाजारावर दबाव ! भाव काय राहतील ?

 

Turmeric Rate : हळदीच्या भावावर दबाव कायम आहे. देशातील काही भागात जानेवारीपासून हळद दाखल होऊ शकते. ही हळद बाजारात येण्याची आधी बाजारात मागील हंगामातील स्टाॅकची विक्री होऊ शकते, असा अंदाज सध्या बांधला जात आहे. यामुळे हळदीच्या भावावर दबाव असल्याचे अभ्यासकांनी सांगितले.

देशातील हळद लागवड आणि पिकावर यंदा दुष्काळी परिस्थितीचा परिणाम होत आहे, असे अहवाल मागील काही महिन्यांपासून येत आहेत. पण सप्टेंबर महिन्यात काही भागात चांगला पाऊस झाला. यामुळे हळद पिकाला काहीसा आधार मिळाला, असेही अहवाल अनेक संस्थानी दिले.

त्यामुळे हळदीच्या उत्पादनात अपेक्षेपेक्षा कमी घट होऊ शकते, असा अंदाज दिला जात आहे. तसं पाहीलं तर हळदीच्या उत्पादकतेला या पावसाचा किती फायदा होईल, हे पुढील काळात कळेलच. पण हळद पिकाला वातावरण काहीसे पोषक असल्याची चर्चा बाजारात आहे. यामुळे हळदीचे व्यवहार धीम्या गतीने होत आहेत. Turmeric Rate

देशातील हळदीचा नवा माल जानेवारी ते मार्च या दरम्यान वेगवेगळ्या टप्प्यात सुरु होतो. या काळात पिकाला पोषक वातावरण राहते का? यावरूनही बाजार ठरेल. सध्याचा हवामान विभागाचा आणि इतर सस्थांचा अंदाज पाहीला तर तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता आहे. याचा फटका हळद पिकाला बसू शकतो. परिणामी हळद उत्पादकतेतही घट दिसू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

देशातील हळद बाजाराचा आलेख बघितला तर सुरुवातीपासून बाजाराला आधार देणाऱ्या घडामोडी घडत होत्या. यंदा आंतरराष्ट्रीय बाजारातून मागणी वाढली होती. त्यामुळे निर्यात जवळपास २५ टक्क्यांनी वाढली. तसेच हळदीच्या उत्पादनातही घट येण्याचा अंदाज आहे. उत्पादन नेमकी किती कमी होईल याबाबत वेगवेगळे अंदाज आहे. पण महाराष्ट्र, तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये लागवड कमी होण्यासह उत्पादकतेला फटका बसणार आहे.

दराचा विचार केला तर मागील काही दिवसांपासून भाव स्थिर आहेत. बाजार समित्यांमध्ये हळदीला प्रतिक्विंटल सरासरी ११ हजार ते १३ हजारांच्या दरम्यान भाव मिळत आहे.

तर वायद्यांमध्ये १३ हजार ते १५ हजार रुपयांच्या दरम्यान हळदीचे व्यवहार होत आहेत. हळदीच्या बाजारात एखादी तेजी येईल, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. पण बाजारात विक्री कशी होते यावर पुढील काळात भाव अवलंबून असतील, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Turmeric Rate

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top