कृषी महाराष्ट्र

गहू लागवड माहिती

गहू लागवड माहिती – Wheat Cultivation

 

गहू लागवडी साठी पाण्याचा चांगला निचरा होणारी, मध्यम ते भारी जमीन निवडावी. जिरायती गव्हाची पेरणी ऑक्‍टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात करावी. बागायती गव्हाची पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. बागायती गव्हाची पेरणी 15 नोव्हेंबरनंतर उशिराने केल्यास प्रत्येक पंधरवड्यात गव्हाचे उत्पादन हेक्‍टरी 2.5 क्विंटल एवढे घटते असे आढळून आलेले आहे.

पश्‍चिम महाराष्ट्रातील बागायती क्षेत्रातील काळ्या जमिनीत सोयाबीन- गहू या पीक पद्धतीमध्ये गव्हाची पेरणी 12 ते 18 नोव्हेंबर या कालावधीत करावी. बागायत उशिरा गव्हाची पेरणी उशिरात उशिरा म्हणजे डिसेंबरअखेरपर्यंत करावी. उशिरा पेरणी केलेल्या गव्हास थंड हवामानाचा कालावधी कमी मिळत असल्यामुळे उत्पादनात बरीच घट येते.

पेरणीची वेळ

बागायती गव्हाची पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात करावी व उशिरा पेरणी १६ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरपर्यंत करावी. बागायती गव्हाची पेरणी १५ नोव्हेंबरनंतर उशिराने केल्यास प्रत्येक पंधरवड्यात गव्हाचे उत्पादन हेक्टरी २.५ किंवटल एवढे घटते असे आढळून आलेले आहे.

जिरायत गव्हाची पेरणी ऑक्टोबरच्या दुस-या पंधरावड्यात करावी.

जमीन

गहू पिकासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन अत्यंत आवश्यक असते.

हवामान

गहू पिकासाठी थंड, कोरडे आणि स्वच्छ सूर्यप्रकाश असणारे हवामान चांगले मानवते. गहू पिकाच्या वाढीसाठी ७ ते २१ अंश सें.ग्रे. तापमानाची आवश्यकता असते. दाणे भरण्याच्यावेळी २५ अंश सें.ग्रे. इतके तापमान असल्यास दाण्यांची वाढ चांगली होऊन दाण्यांचे वजन वाढते.

पेरणीच्या पद्धती

बागायत वेळेवर पेरणीसाठी जमिनीत ओलावा नसल्यास जमीन ओलावून घ्यावी. वाफसा आल्यानंतर जमीन कुळवावी. पेरणीसाठी प्रति हेक्‍टरी 100 ते 125 किलो बियाणे वापरावे. रासायनिक खतांचा पहिला हप्ता आणि गहू बियाणे दोन चाड्यांच्या पाभरीने एकत्रित पेरावे. एकेरी पेरणी करावी. त्यामुळे योग्य प्रकारे आंतरमशागत करता येते.
बागायत उशिरा पेरणीसाठी प्रति हेक्‍टरी 125 ते 150 किलो बियाणे रासायनिक खतांच्या पहिल्या हप्त्यासह दोन चाड्यांच्या पाभरीने एकेरी पद्धतीने पेरावे.

गव्हाच्या बियाण्यास पेरणीपूर्वी प्रति किलो बियाणास तीन ग्रॅम थायरमची बीज प्रक्रिया करावी. यानंतर प्रति किलो बियाण्यासाठी 25 ग्रॅम ऍझोटोबॅक्‍टरची बीजप्रक्रिया करावी. हे जिवाणूसंवर्धक कीडनाशक आणि रासायनिक खतांबरोबर एकत्रित मिसळू नये. जिवाणूसंवर्धकामुळे बियाण्याची उगवण लवकर व चांगली होते, तसेच उत्पादनातही वाढ होते.

पीक व्यवस्थापन

बागायत वेळेवर पेरणीसाठी प्रति हेक्‍टरी 25 ते 30 गाड्या शेणखत वापरावे, तसेच प्रति हेक्‍टरी 120 किलो नत्र, 60 किलो स्फुरद (375 कि. सिंगल सुपर फॉस्फेट) आणि 40 किलो पालाश (65 कि. म्युरेट ऑफ पोटॅश) द्यावे. निम्मे नत्र (130 कि. युरिया) आणि संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळी द्यावे. उरलेले निम्मे नत्र (130 कि. युरिया) पेरणीनंतर तीन आठवड्यांनी खुरपणी करून द्यावे.
बागायत उशिरा पेरणीसाठी पेरणीच्या वेळी प्रति हेक्‍टरी 40 किलो नत्र (87 कि. युरिया), 40 किलो स्फुरद (250 कि. सिंगल सुपर फॉस्फेट) आणि 40 किलो पालाश (65 कि. म्युरेट ऑफ पोटॅश) द्यावे.
पेरणीनंतर तीन आठवड्यांनी शेताची खुरपणी करून प्रति हेक्‍टरी 40 किलो नत्राची मात्रा (87 कि. युरिया) द्यावी.

पाणी व्यवस्थापन

जिरायती गहू पिकाची वाढ ही जमिनीतील उपलब्ध ओलाव्यावरच होत असते. बागायत वेळेवर आणि बागायत उशिरा पेर केलेल्या गहू पिकासाठी जमिनीच्या मगदुरानुसार पाण्याच्या पाळ्या कमी- जास्त होऊ शकतात. गहू पिकास देण्यासाठी एकच पाणी उपलब्ध असेल तर ते पेरणीनंतर 40 ते 42 दिवसांनी द्यावे.

सुधारित वाण

  1. जिरायती पेरणीसाठी – पंचवटी (एनआयडीडब्ल्यू- 15), शरद (एकेडीडब्ल्यू- 2997- 16)
  2. जिरायती आणि मर्यादित सिंचन – नेत्रावती (एनआयएडब्ल्यू- 1415)
  3. बागायत वेळेवर पेरणीसाठी – तपोवन (एनआयएडब्ल्यू- 917), गोदावरी (एनआयडीडब्ल्यू- 295), त्र्यंबक (एनआयएडब्ल्यू- 301), एमएसीएस- 6222
  4. बागायत उशिरा पेरणीसाठी – एनआयएडब्ल्यू- 34, एकेएडब्ल्यू- 4627

प्रचलित वाण

सध्यस्थितीत महाराष्ट्रात विविध परिस्थितीसाठी खालील वाण प्रसारित करण्यात आलेले आहेत.

वाणाचे नाववैशिष्टे
कोरडवाहू लागवड 
पंचवटी

(एन.आय.दि.ए.डब्लू-१५

(१) जिरायती पेरणीसाठी उत्तम बन्सी वाण(२) दाणे टपोरे, चमकदार आणि आकर्षक (३) प्रथिनांचे प्रमाण (एन.आय.डी.ए.डब्लू-१५ ) १२ टक्के (४) तांबेरा रोगास प्रतिकारक (५) रवा, शेवया, कुरडया यासाठी उत्तम (६) १o५-११० दिवसात कापणीस तयार (७) उत्पादन १२ ते १५ किंवटल प्रती हेक्टर नेत्रावती
नेत्रावती

(एन.आय.ए.डब्लू १४१५)

(१) द्विपकल्पीय विभागातील जिरायतीत किंवा एका ओलिताखाली वेळेवर पेरणीसाठी (२) तांबेरा रोगास (एन.आय.ए.डब्ल्यू. १४१५) प्रतिकारक (३) प्रथिने १२ टक्क्यांपेक्षा जास्त (४)चपातीसाठी उत्तम (५) लोह ४३ पीपीएम, जस्त ५५.५ पीपीएम (६) उत्पादन : जिरायत १८ ते २० किंव./हेक्टर, एक सिंचन २२ ते २५ किंव./हेक्टर बागायती वेळेवर पेरणी त्र्यंबक
बागायती वेळेवर पेरणी
त्र्यंबक

(एन.आय.ए.डब्लू ३०१)

(१) बागायती वेळेवर पेरणीसाठी उत्तम सरबती वाण (२) दाणे टपोरे आणि आकर्षक (३) प्रथिनांचे प्रमाण१२ टक्क्यांपेक्षा अधिक (४) तांबेरा रोगास प्रतिकारक (५) चपातीसाठी उत्तम वाण

(६) ११o-११५ दिवसात कापणीस तयार (७) उत्पादन ४५ ते ५o किंवटल प्रती हेक्टर तपोवन

तपोवन

(एन.आय.ए.डब्लू – ९१७)

(१) बागायती वेळेवर पेरणीसाठी उत्तम सरबती वाण (२) दाणे मध्यम परंतु ऑब्यांची संख्या जास्त (एन.आय.ए.डब्ल्यू-९१७) (३) प्रथिनांचे प्रमाण १२.५ टक्के (४) तांबेरा रोगास प्रतिकारक (५) चपातीसाठी उत्तम वाण (६) ११५- १२० दिवसात कापणीस तयार (७) उत्पादन ४५ ते ५o किंवटल प्रती हेक्टर
गोदावरी (एन.आय.डी.डब्ल्यू- २९५)१) बागायती वेळेवर पेरणीसाठी उत्तम बक्षी वाण (२) दाणे टपोरे, चमकदार आणि आकर्षक (३) प्रथिनांचे प्रमाण १२ टक्क्यांपेक्षा अधिक (४) तांबेरा रोगास प्रतिकारक (५) रवा, शेवया, कुरडया यासाठी उत्तम (६) ११५ – १२० दिवसात कापणीस तयार (७) उत्पादन ४५ ते ५o किंवटल प्रती हेक्टर
फुले समाधान (एन.आय.ए.डब्ल्यू- १९९४)(१) महाराष्ट्र राज्यातील बागायत वेळेवर आणि बागायत उशिरा पेरणीसाठी योग्य (२) तांबेरा रोगास प्रतिकारक (३) प्रथिने १२ टक्क्यांपेक्षा जास्त (४) चपातीसाठी उत्तम (५) उत्पादन : वेळेवर पेरणी- ४५ ते ५० किंवटल प्रती हेक्टर तर उशिरा पेरणी – ४२ ते ४५ किंवटल प्रती हेक्टर
एम.ए.सी.एस.- ६२२२(१) द्विपकल्पीय विभागात बागायती वेळेवर शिफारशीत सरबत्ती वाण (२) टपोरे दाणे (३) प्रथिने १२.५ टक्क्यांपेक्षा अधिक (४) तांबेरा रोगास प्रतिकारक (५) चपातीसाठी उत्तम वाण (६) ११५ ते १२० दिवसात कापणीस तयार (७) उत्पादन ४५ ते ५o किंवटल प्रती हेक्टर
एम.ए.सी.एस. – ६४७८(१) द्विपकल्पीय विभागात बागायती वेळेवर शिफारशीत सरबत्ती वाण (२) टपोरे दाणे (३) प्रथिने १४ टक्क्यांपेक्षा अधिक (४)तांबेरा रोगास प्रतिकारक (५) चपातीसाठी उत्तम (६) सुक्ष्मअन्नद्रव्ये (उच्च पोषणमूल्ये) : लोह ४२.८ पी.पी.एम., जस्त ४४.१ पी.पी.एम.(प्रति दशलक्ष भाग) (७) पक्व होण्याचा कालावधी ११५ ते १२० दिवस (८) उत्पादनक्षमता ४७ ते ५२ किंवटल/हेक्टरी
बागायती उशिरा पेरणी
एन.आय.डी.डब्लू – ३४(१) बागायती उशिरा पेरणीसाठी उत्तम सरबत्ती वाण (२) दाणे मध्यम आणि आकर्षक (३) प्रथिनांचे प्रमाण १३ टक्के (४) तांबेरा रोगास प्रतिकारक (५) चपातीसाठी उत्तम वाण (६) १oo ते १o५ दिवसात कापणीस तयार (७) उत्पादन ३५ ते ४० किंवटल प्रती हेक्टर
ए.के.ए.डब्ल्यू- ४६२७(१) द्विपकल्पीय विभागात बागायती उशिरा पेरणीसाठी शिफारशीत सरबती वाण (२) तांबेरा रोगास प्रतिकारक (३) प्रथिने १२ टक्क्यांपेक्षा जास्त (४) चपातीसाठी उत्तम (५) पक्व होण्याचा कालावधी बागायती वेळेवर पेरणीसाठी ९५-१oo दिवस (६) उत्पादनक्षमता बागायती उशिरा पेरणीखाली ४२ ते ४५ किंवटल/ हेक्टरी
ए.के.ए.डब्ल्यू- ४२१o(१) महाराष्ट्रातील बागायती उशिरा पेरणीसाठी शिफारशीत सरबती वाण (२) तांबेरा रोगास प्रतिकारक (३) प्रथिने १२ टक्क्यांपेक्षा जास्त (४) चपातीसाठी उत्तम (५) पक्व होण्याचा कालावधी बागायती वेळेवर पेरणीसाठी ९५-१oo दिवस (६) उत्पादन ४२ ते ४५ किंवटल प्रती हेक्टर.

रासायनिक खते

गहू पिकासाठी रासायनिक खतांच्या मात्रा जिरायत, बागायत वेळेवर व बागायत उशिरा पेरणीसाठी वेगवेगळ्या शिफारस केलेल्या आहेत.

पेरणीच्या वेळीनत्र

(किलो हेक्टर)

स्फुरद

(किलो हेक्टर)

पालाश

(किलो हेक्टर)

बागायत वेळेवर पेरणी१२०६०४०
बागायत उशिरा पेरणी८०४०४०
जिरायत पेरणी४०२०00

बागायती गहू पिकासाठी अर्धे नत्र , संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळी द्यावे व राहिलेले अर्धे नत्र पेरणीनंतर तीन आठवड्यांनी खुरपणी झाल्यावर आणि पहिल्या पाण्याच्या पाळी अगोदर द्यावे. जिरायत पेरणी करताना नत्र आणि स्फुरद पेरणीच्यावेळी द्यावे .

दोन पाणी उपलब्ध असतील तर पहिले पाणी पेरणीनंतर 20 ते 22 दिवसांनी आणि दुसरे पाणी 60 ते 65 दिवसांनी द्यावे आणि तीन पाणी उपलब्ध असतील, तर पहिले पाणी पेरणीनंतर 20 ते 22 दिवसांनी, दुसरे पाणी 42 ते 45 दिवसांनी आणि तिसरे पाणी 60 ते 65 दिवसांनी द्यावे.

– 02550 – 241023
कृषी संशोधन केंद्र, निफाड, जि. नाशिक

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top