कृषी महाराष्ट्र

पंजाब डख यांचा अंदाज : डिसेंबर महिन्यात तीन दिवस पावसाची शक्यता !

पंजाब डख यांचा अंदाज : डिसेंबर महिन्यात तीन दिवस पावसाची शक्यता !

पावसाची शक्यता

Panjabrao Dakh : परभणीतील हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजावर शेतकऱ्यांचा मोठा गाढा विश्वास आहे. शेतकरी बांधवांच्या मते, हवामान विभागाच्या अंदाजाच्या तुलनेत पंजाबरावांचा अंदाज समजायला सोपा आणि तंतोतंत खरा ठरत आहे.

याचा त्यांना शेतीचे नियोजन करताना फायदा होत आहे. दरम्यान पंजाबराव डख अहमदनगर जिल्ह्यात आले असता त्यांनी आपला नवीन हवामान अंदाज सार्वजनिक केला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी वांबोरी मध्ये भूमी इनरिच कंपनीतर्फे एका शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

या शेतकरी मेळाव्याला प्रमुख उपस्थिती पंजाबराव डख यांची होती. या मेळाव्या दरम्यानच पंजाबराव डख यांनी आपला नवीन हवामान अंदाज सार्वजनिक केला आहे. पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या आपल्या नवीनतम हवामान अंदाजानुसार, आज पासून ते पाच डिसेंबर पर्यंत अहमदनगर जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम राहणार आहे.

यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडणार आहे. विशेष म्हणजे अहमदनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता असल्याचे डख यांनी नमूद केले आहे. पंजाबरावांच्या मते अहमदनगर जिल्ह्यात 12 डिसेंबर पासून ते 14 डिसेंबर पर्यंत म्हणजेच तीन दिवस पावसाची शक्यता आहे.

अवकाळी पावसाची शक्यता लक्षात घेता शेतकरी बांधवांनी आपल्या शेतीमधील कामांच नियोजन आखण गरजेचे आहे. दरम्यान पंजाबराव डख यांनी या कार्यक्रमादरम्यान मान्सून आगमनाची स्थिती स्पष्ट केली आहे. पंजाबरावांच्या मते पूर्वी मान्सून हा पश्चिमेकडून अर्थातच मुंबईमधून महाराष्ट्रात दाखल होत असे. मात्र आता गेल्या दोन वर्षात मान्सून हा नागपुर म्हणजेच पूर्वेकडून दाखल होत आहे.

त्यामुळे राज्यातील अहमदनगर, नासिक, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सांगली, सातारा यांसारख्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे. याशिवाय ग्लोबल वॉर्मिंग जागतिक तापमान वाढ देखील पाऊस वाढीसाठी कारणीभूत ठरत आहे, असं मत यावेळी पंजाब रावांनी व्यक्त केल आहे.

source : ahmednagarlive24

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top