कृषी महाराष्ट्र

Soybean Crop : सोयाबीन पिकासाठी वाढ संवर्धकावर संशोधन

Soybean Crop : सोयाबीन पिकासाठी वाढ संवर्धकावर संशोधन

 

Soybean Crop : सोयाबीन पिकात ‘कायटोसॅन मॉल्युकूल’ चा वापर वाढ संवर्धक म्हणून करता येईल का ? याची चाचपणी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गतच्या यवतमाळ येथील जैव तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या वतीने करण्यात येत आहे. बुलडाणा, अकोला, वाशीम, वर्धा, अमरावती जिल्ह्यांत या संदर्भाने चाचण्या घेण्यात येत असल्याचे या प्रकल्पाचे प्रमुख डॉ. प्रशांत शिंगोटे यांनी सांगितले. Soybean Crop

राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग मुंबईकडून या प्रकल्पास ६२.३६ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. डिसेंबर २०२२ पासून सुरु झालेल्या या प्रकल्पाचा कालावधी तीन वर्षांचा आहे. ‘जैविकदृष्ट्या संश्‍लेषित कायटोसॅन नॅनो कणांचे एक उत्तेजक वाढवर्धक प्रभावी माध्यम’ असे या प्रकल्पाचे नाव आहे.

त्याकरिता समुद्री सजीवांच्या स्त्रोतातून मिळवलेल्या घटकांवर तांत्रिक प्रक्रियेतून ‘कायटोसॅन’ मिळवले जाते. सुरुवातीच्या काळात सोयाबीन पिकाची योग्य वाढ करून घेण्यासाठी ‘कायटोसॅन मॉल्युक्‍युल’चा वाढवर्धक (बायोस्टीमूल्यंट, एलिसेटर) म्हणून वापराची चाचपणी केली जात आहे. पाण्याचा ताण असलेल्या काळात याची फवारणी केल्यानंतर पिकाची चांगली वाढ होते. Soybean Crop

सध्या सोयाबीनमध्ये याचा प्रभाव तपासला जात आहे. त्यानंतर अन्य पिकात वापर करून त्याचीही निरीक्षणे घेतली जातील.’’ असे डॉ. प्रशांत शिंगोटे यांनी सांगितले. एका अर्थी ‘कायटोसॅन हे ‘स्ट्रेस टॉलरंट’ (अजैविक ताण सहनशीलता) व रोग प्रतिकारक म्हणून पर्याय ठरू शकतो, असेही यापूर्वीच्या अभ्यासाचे निरीक्षण आहे.

कायटोसॅनचा वापर सोयाबीन पिकात वाढ संवर्धकासारखा करता येईल का? याची चाचपणी होत आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास सोयाबीनची उत्पादकता वाढीस सहाय्य होईल.
– डॉ. प्रशांत शिंगोटे, प्रकल्प प्रमुख..

Soybean Crop

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top