कृषी महाराष्ट्र

वैरणीकरिता शेवगा लागवड योजनेतून आता मिळणार सवलतीत बियाणे

वैरणीकरिता शेवगा लागवड योजनेतून आता मिळणार सवलतीत बियाणे

 

सोलापूर : सोलापूर जिल्हा पशुसंवर्धन विभागांतर्गत (Department Of Animal Husbandry) एकूण अकरा तालुक्यातून १० गुंठे/आर क्षेत्र किंवा १० आरच्या पटीत क्षेत्राकरिता राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत वैरणीकरिता शेवगा लागवड (Moringa Cultivation) करणे अनुसूचित जाती उपयोजना राबविण्यात येत आहे. इच्छुक पशुपालकांनी आठ जानेवारीपर्यंत आपले अर्ज भरून द्यावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. भास्कर परांडे यांनी केले आहे.

या योजनेअंतर्गत फक्त अनुसूचित जाती प्रवर्गातील पशुपालक शेतकऱ्यांना वैरणीकरिता शेवगा लागवड करण्यासाठी अनुदान वितरित करण्यात येणार आहे. योजनेअंतर्गत प्रति लाभार्थी क्षेत्र मर्यादा १० गुंठे / आर क्षेत्र किंवा १० आरच्या पटीत, प्रति १० गुंठे ७५० ग्रॅम शेवगा (पीकेएम-१) बियाणाची किंमत रु.६७५/- व उर्वरित अनुदान रु. २३२५/- असे एकूण अनुदान रु.३००० दिले जाणार आहे.

तसेच प्रति लाभार्थी क्षेत्र मर्यादा कमीत कमी व अधिकतम एक हेक्टर असून, प्रति हेक्टर ७.५ किलो शेवगा (पीकेएम-१) बियाण्याची किंमत रु.६७५०/- व उर्वरित अनुदान रु.२३,२५०/- हे दोन टप्प्यांमध्ये वितरित करण्यात येणार आहे. बियाण्याचा थेट पशुपालकांना पुरवठा करण्यात येणार असून, उर्वरित अनुदानातून जमिनीची मशागत व लागवड, खतांची खरेदी व इतर आनुषंगिक खर्च करावयाचा आहे. या योजनेकरिता पशुपालक/शेतकरी यांनी संबंधित पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती आणि नजीकचा पशुवैद्यकीय दवाखाना यांच्याशी संपर्क साधावा.

शेवग्याच्या शेतीतून किती कमाई होते :-

एका एकरात 1500 रोपे लावली तर. शेवग्याची झाडे अंदाजे 12 महिन्यांत उत्पादन देतात. झाडे चांगली वाढली तर 8 महिन्यांत तयार होतात आणि एकूण उत्पादन 3000 किलोपर्यंत जाते.अशा प्रकारे 7.5 लाख उत्पादन होऊ शकते.अशा प्रकारे, शेवग्याच्या लागवडीतून तुम्हाला 6 लाख रुपयांपर्यंतचा फायदा होऊ शकतो.

स्रोत : agrowon.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top