Soil Health : भूसुधारकांचा चोपण जमीन सुधारण्यासाठी वापर कसा करावा ? वाचा सविस्तर
Soil Health
Kharif Season 2023 : पिकाची वाढ होण्यासाठी जमीन हे महत्वाचे माध्यम आहे. माती, सेंद्रिय पदार्थ, हवा आणि पाणी हे जमिनीचे प्रमुख चार घटक आहेत. ज्या जमिनीत पिकांची वाढ चांगली होते.
जमिनीची संरचना म्हणजेच घडण उत्तम राहण्यासाठी जमिनीची योग्य मशागत व सेंद्रिय पदार्थाचा भरपूर वापर करावा. पिकांची फेरपालट करावी.
ज्या जमिनीत पाण्याचा निचरा होत नाही वाळल्यानंतर जमीन टणक होते, भेगा पडतात, ओल्यापणी जमिनीअतिशय चिबड होते ती जमीन चोपण बनते.
अशा जमिनीत विनीमययुक्त सोडियमचे प्रमाण शेकडा १५ पेक्षा जास्त असते. विद्राव्य क्षारांची विद्युतवाहकता ४ डेसी सायमन प्रति मीटर पेक्षा कमी असते व सामू ८.५ ते १० पर्यंत असतो.
अशा जमिनीत हवा खेळती राहत नाही व त्यामुळे पिकांची वाढ योग्य होत नाही.
विविध उपाययोजना करुन चोपण जमिनीची सुधारणा करता येते. यापैकी भुसुधारकांचा वापर करुन जमिनीची सुधारणा कशी करायची याविषय़ीची माहिती पाहुया.
जिप्समचा वापर
चोपण जमीन सुधारण्यासाठी जिप्सम, गंधक, फेरस सल्फेट, आयर्न पायराईट, फॉस्फोजिप्सम यासारख्या रासायनिक भूसूधारकांचा उपयोग करता येतो. जिप्सम वापरायचे असेल तर माती परिक्षण करुन जिप्समची गरज ठरविल्यानंतर आवश्यकतेचा अर्धा भाग जिप्सम पहिल्या वर्षी आणि उरलेला अर्धा भाग जिप्सम दोन वर्षानंतर शेणखतात मिसळून वापरावा.
जिप्सममध्ये एक टक्क्यापेक्षा जास्त सोडियम ऑक्साईडचे प्रमाण असू नये. जिप्सम पावडर जमिनीच्या पृष्ठभागावर वरच्या २० सेंमी थरात चांगली मिसळून घ्यावी, म्हणजे पावसानंतर भरपूर पाणी मिसळून जिप्समची प्रक्रिया चांगली होण्यास मदत होते.
हे पण वाचा : जीवाणू संवर्धनाचा उत्पादन वाढविण्यासाठी वापर कसा करावा ? वाचा सविस्तर
जिप्सममधील कॅल्शिअमची मातीच्या चिकण कणांना चिकटलेल्या सोडियमशी अभिक्रिया होऊन सोडियम सल्फेट तयार होते. सोडियम सल्फेट विद्राव्य असल्याने त्याचा जमिनीतून निचरा होऊन जमिनीचा आम्लविम्ल निर्देशांक कमी होतो आणि जमिनीची भौतिक जडण घडण सुधारते. Soil Health
गंधक
गंधकाचा वापर चुनखडीयुक्त चोपण जमीन सुधारण्यासाठी होतो. गंधकावर पाण्याची व हवेतील ऑक्सिजनची अभिक्रिया होऊन गंधक आम्ल तयार होते. हे गंधक आम्ल जमिनीतील चुनखडीवर अभिक्रिया करते व त्याचे कॅल्शियम सल्फेट तयार होते.
जिप्सममधील कॅल्शिअमचे जमिनीतील सोडीयमशी संयोग होऊन सोडीयमचे प्रमाण कमी होते. तसेच चुनखडीयुक्त चोपण जमिनीत माती परिक्षणानुसार जिप्सम गरजेच्या १५ भाग गंधक शेणखतात मिसळून भुसूधारक म्हणून वापरणे फायदेशीर ठरते.
source : agrowon