कृषी महाराष्ट्र

Soybean Market : सोयाबीन आंतरराष्ट्रीय बाजारात तेजीत : देशात मात्र दबाव ! वाचा सविस्तर

Soybean Market : सोयाबीन आंतरराष्ट्रीय बाजारात तेजीत : देशात मात्र दबाव ! वाचा सविस्तर

Soybean Market

Soybean Market : आंतरराष्ट्रीय बाजारात आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी सोायबीनच्या वायद्यांमध्ये चांगलीच वाढ पाहायला मिळाली. सोयाबीनचे वायदे जवळपास ३ टक्क्यांनी तर सोयापेंडच्या वायद्यांमध्ये ६ टक्क्यांची वाढ झाली होती.

पण याचा परिणाम देशातील बाजारावर दिसला नाही. देशात सोयाबीनची भावपातळी कायम होती. पण देशातील पाऊस लांबला आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी टिकल्यास देशातही दरवाढ शक्य आहे, असे जाणकारांनी सांगितले.

तोपर्यंत अमेरिकेतील सोयाबीन पेरणी जवळपास पूर्ण झाली. यंदा अमेरिकेत सोयाबीन उत्पादन ६४ लाख टनांनी वाढून १ हजार २२७ लाख टनांवर पोहोचेल, असा अंदाज ‘यूएसडीए‘ने व्यक्त केला. अमेरिकेत यंदा पेरा वाढण्याची शक्यता होती, पण तसे झाले नाही. गेल्या वर्षी ऐवढेच क्षेत्र अमेरिकेत सोयाबीन खाली आले.

पण अमेरिकेतील मध्य पूर्वेतील भागात सध्या उष्ण वातावरण आहे. अनेक भागात पिकाला पोषक पाऊस झाला नाही. मागील काही दिवसांमध्ये या भागात पाऊस नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादन शेवटी पाऊसमान कसे राहते यावर अवलंबून राहील. पण सध्याच्या वातावरणामुळे शेतीमाल बाजारालाही आधार मिळाला.

किती झाली वाढ ?

सोयाबीन उत्पादक भागात पाऊस नसल्याने दरात वाढ पाहायला मिळत आहे. शुक्रवारी सीबाॅटवर सोयाबीनचे वायदे २.६६ टक्क्यांनी वाढले होते. शुक्रवारी सोयाबीनचे वायदे १४.६६ डाॅलरवर बंद झाले होते. सोमवारी १३.७३ डाॅलरवर बाजार सुरु झाला होता. Soybean Market

म्हणजेच आठवड्यात सोयाबीनच्या वायद्यांमध्ये ९३ सेंटची वाढ झाली होती. सोयापेंडचे वायदेही ५.६२ टक्क्यांनी वाढले होते. शुक्रवारी सोयापेंडचे वायदे ४१६ डाॅलरवर बंद झाले. सोमवारी सोयापेंडचे वायदे ३७३ डाॅलरवर सुरु झाले होते. सोयातेलाचे वायदेही दोन टक्क्यांनी वाढून ६० सेंट प्रतिपाऊंडवर पोचले होते.

तेजी टिकेल का ?

आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकेतील कमी पावसाचा परिणाम झाला. पाऊस असाच लांबला तर ही तेजी जास्त काळ टिकू शकते. तसेच अमेरिकेतील सोयाबीन उत्पादनाला फटका बसण्याचे संकेत मिळाल्यास दरवाढ कायम राहू शकते. पण आठवडाभरात चांगला पाऊस झाल्यानंतर दरही कमी होऊ शकतात. त्यामुळे वायदेबाजारातील ही तेजी जास्त काळ टिकेलच असे नाही.

देशातील बाजाराला आधार मिळेल का ?

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन तेजीत आले तरी देशात मात्र भावपातळी कायम होती. देशातील बाजारात आज १ लाख ८० हजार क्विंटलच्या दरम्यान आवक झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. तर सरासरी दरपातळी ४ हजार ६०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. देशातही माॅन्सून अद्यापपर्यंत लांबलेला आहे.

सोयाबीनची लागवडही गेल्यावर्षीपेक्षा पिछाडीवर आहे. पण हा सुरुवातीचा काळ आहे. त्यामुळे देशातील बाजारावर याचा परिणाम दिसला नाही. पण पाऊस लांबला आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी टिकल्यास देशातही दरवाढ शक्य आहे, असे जाणकारांनी सांगितले.

source : agrowon

Soybean is booming in the international market

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top