कृषी महाराष्ट्र

Farm Pond Subsidy : शेततळ्यासाठी १७ लाखांचे अनुदानवाटप ! वाचा संपूर्ण

Farm Pond Subsidy : शेततळ्यासाठी १७ लाखांचे अनुदानवाटप ! वाचा संपूर्ण

Farm Pond Subsidy

Solapur News : मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे या योजनेतून जिल्ह्यात २०२२-२३ मध्ये ४० शेतकऱ्यांचे अर्ज पात्र ठरले असून, त्यातील ३४ शेतकऱ्यांना १७ लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी दिली.

श्री. शिंदे म्हणाले, की पावसाळ्यात ओढे, नाले, नदी आदींद्वारे वाहून जाणारे पाणी उपसून अथवा तलाव, विहीर, बोअर अशा अन्य सिंचन सुविधांमधून पाण्याचा उपसा करून त्याची साठवणूक करण्याकरिता शेतावर शेततळ्यासारखी पायाभूत सुविधा उभी करण्यासाठी कृषी विभागामार्फत मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे ही योजना राबविण्यात येत आहे. Farm Pond Subsidy

विविध आकारमानाच्या शेततळ्यासाठी कमाल ७५ हजार रुपये रक्कमेच्या मर्यादेत अनुदान देण्यात येत आहे. गत आर्थिक वर्षात जिल्हाभरातून ८ हजार १५६ अर्ज ऑनलाइन पद्धतीने प्राप्त झाले.

त्यातील महाडीबीटी ऑनलाइन पोर्टलवर प्राप्त अर्जातून संगणकीय प्रणालीद्वारे सोडतीने ९०१ शेतकऱ्यांची निवड करण्यात आली. त्यातील ६५३ अर्जांवर कार्यवाही सुरू आहे. त्यातील ४० अर्ज अनुदानासाठी मंजूर करण्यात आले असून, ३४ शेतकऱ्यांना १६ लाख ८६ हजार ९९३ रुपये अनुदान वाटप करण्यात आले आहे.

शेततळ्यासाठी इथे करा अर्ज Farm Pond Subsidy

शेतकऱ्यांनी http://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर CSC केंद्रावरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. ऑनलाइन अर्ज करतेवेळी महाडीबीटी प्रणालीवर with inlet-outlet/without inlet-outlet यापैकी एका बाबीची निवड करावी. महाडीबीटी ऑनलाइन पोर्टलवर प्राप्त अर्जातून संगणकीय प्रणालीद्वारे सोडतीने निवड केली जाते.

तालुकानिहाय वाटप केलेले अनुदान

तालुकानिहाय अनुदान वाटप केलेले शेतकरी आणि कंसात अनुदान रक्कम पुढीलप्रमाणे- बार्शी- एक (५६, ८१८ रुपये), करमाळा – एक (७५ हजार रुपये), माढा- आठ (१ लाख ९६ हजार ७१४ रुपये), माळशिरस – एक (७५ हजार रुपये), मंगळवेढा – सात (३ लाख२ हजार ४०२ रुपये), मोहोळ – दोन (दीड लाख रुपये) पंढरपूर – सहा (२ लाख ९० हजार ८५३ रुपये), सांगोला- ४ (तीन लाख रुपये)दक्षिण सोलापूर- चार (दोन लाख ४० हजार २०६ रुपये).

source:agrowon

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top