आता वाट पाहू नका देऊन टाका ! कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी
कापूस उत्पादक शेतकरी
बाजारात कापसाठी आवक मंदावली आहे, मात्र कापसावर दबाव वाढत आहे, म्हणजेच कापसाची मागणी आहे. नागपूर जिल्ह्यातील उमरेड कृउबात कापसाची सर्वात जास्त आवक झाली. १ हजार १३० क्विंटल कापसाची आवक झाली. वर्ध्यात कापसाला आज सर्वाधिक जास्त भाव मिळाला, ८ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल असा कापसाला भाव मिळाला.
यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत आहे. सरासरी भाव, ७ हजार ३०० रुपये असा आहे. मात्र किनवट, भद्रावती, पारशिवनी, उमरेड, वरोरा-माढेली, काटोल येथे कापसाला सरासरी भाव हा ८ हजार रुपये क्विंटलच्या आसपास होता. ही शेतकऱ्यांसाठी नक्कीच आनंदाची बातमी आहे. (Cotton Market)
सध्या कापूस घरात ठेवून दिवसेंदिवस उष्णता वाढली तर कापसाचे वजन कमी होते, घरात ओल लागली, किंवा अवकाळी पावसामुळेही कापूस खराब होण्याची भीती असते. म्हणून कापूस विकून हातात पैसे आल्यावर इतर शेतीच्या कामाकडे मोर्चा वळवणे शेतकऱ्याला कधीही परवडतं.
आता कापूस भाववाढीची ही बातमी शेतकऱ्यांसाठी नक्कीच आनंदाची बातमी आहे, आता जास्त भाववाढीची अपेक्षा न ठेवता, देऊन टाकतो अशीच भूमिका शेतकऱ्याला पडवणार आहे. कापूस तसा सांभाळायलाही कठीण आग लागली तर रोखणं कठीण, राखंच हातात येते, त्यामुळे आणखी काळजी घ्यावी लागते. (Cotton)
दरम्यान, कापूस उत्पादक शेतकरी मागील ३ महिन्यांपासून चिंतेत होते, त्यांच्याकडे सरकारने कोणतंही लक्ष दिलेलं नाही. पण बाजारातील चढऊतार त्यांच्यासाठी आज आशेचा दीप घेऊन आली आहे. यामुळे सध्या तरी चांगले दिवस आले आहेत.
source : krishijagran