कृषी महाराष्ट्र

शेतकऱ्यांनो उन्हाळ्यात पंजाब-हरियाणामधून गाय खरेदी करू नका ! गाईंचा होतोय मृत्यू : वाचा संपूर्ण

शेतकऱ्यांनो उन्हाळ्यात पंजाब-हरियाणामधून गाय खरेदी करू नका ! गाईंचा होतोय मृत्यू : वाचा संपूर्ण

गाय खरेदी

सध्या दुध उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत. यामुळे याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. पंजाब व हरियाणाच्या गाई आपल्या महाराष्ट्रातील गाईच्या दुधापेक्षा किमान दहा लिटरने जास्त दूध देणार्‍या असतात त्या प्रचार व प्रसाराने कोपरगाव तालुक्यासह राहता तालुक्यातील अनेक दूध उत्पादकांनी आपला मोर्चा पंजाब व हरियाणाला वळवला आहे.

तेथे किमान एक लाख ते दीड लाख रुपयांपर्यंतची गाय खरेदी करून ती आपल्या गोठ्यात आणण्याचे मनसुबे पूर्ण करताना शेतकरी दिसत आहे. मात्र गेल्या पंधरा दिवसात या प्रदेशातून आणलेल्या गाई सोनेवाडी डाऊच खुर्द येथे दगवलेल्या आहेत. इतका मोठा खर्च करून गायी खरेदी केली जाते व वाहतुकीसाठी जवळपास पंधरा हजार रुपये खर्च येत आहे.

असे असताना इथे आल्यानंतर अशा घटना घडल्यावर शेतकरी मोठ्या अडचणीत आर्थिक अडचणीत सापडला जातो. त्यामुळे शेतकरी मित्रांनो पंजाब व हरियाणा येथील गायी खरेदी करताना सावधानता बाळगावी शक्यतो उन्हाळ्यामध्ये काही खरेदी करताना थोडं थांबून घ्यावे.

पावसाळा व हिवाळ्यात आलेल्या गाई काही अंशी शेतकर्‍यांच्या गोठ्यात चांगल्या प्रकारे निवडलेल्या आहेत मात्र उन्हाळ्यात आपल्याकडे अधिक उष्ण प्रमाण असल्याने या गाईंना वातावरणाचा फटका बसत आहे. यामुळे धोका वाढत आहे.

जवळपास पाच ते सहा दिवस कंटेनर मध्ये गाईंचा प्रवास असल्याने त्या दमून भागून जातात. त्यामुळे त्यांचे बैठक व्यवस्था नीट होत नाही परिणामी येथे आल्यानंतर त्यांना आरोग्याचा मोठा धोका निर्माण होतो. आणि मग गाई दगावण्याचे प्रमाण वाढते. यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

source:krishijagran

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top